Rajyasabha Election : पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्याकडून विष घेण्याचा प्रयत्न, उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट
मुकुंद गर्जे पंकजा मुंडे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भावना अनावर न झाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पिकांवर मारण्यात येणारे किडक नाशक औषध यावेळी त्याने घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अहमदनगर : राज्यात सध्या विधान परिषदेच्या उमेदवारींवरून (Vidhan Parishad Election 2022) नारजीनाट्याचा पाढा सुरू झालाय. तिकडे भाजपने (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाथर्डी येथे पंकजा मुंडे समर्थकाकडून विषारी औषध घेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र इतर कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत प्राण वाचवले आहेत, इतर कार्यकर्त्यानी औषध घेताना हातातील डबा ओढून घेतला त्यामुळे हा कार्यकर्ता वाचला आहे. अन्याथा काहीतरी विपरीत घडण्याची जास्त शक्यता होती. मुकुंद गर्जे पंकजा मुंडे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भावना अनावर न झाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पिकांवर मारण्यात येणारे किडक नाशक औषध यावेळी त्याने घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर खबरदारी म्हणून गर्जे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार्यकर्त्याचा व्हिडिओ
VIDEO : Pankaja Munde समर्थक Mukund Garjevar चा विष प्यायचा प्रयत्न – tv9#Pankajamunde #MukundGarjevar #Politics pic.twitter.com/oKin9IyrpC
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2022
तर भाजप सत्तेवर येणार नाही…
इतर ठिकाणचेही पंकजा मुंडेंचे समर्थक सध्या खवळले आहेत. जर पकंजा मुंडे यांना विधानपरीषदेवर घेतले नाही तर भाजप ही परत महाराष्ट्रात सत्तेवर येणार नाही, तसेच मुंडे समर्थक येणाऱ्या काळात शांत बसणार नाहीत, हा आमचा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना इशारा आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी भाजप कार्यकर्त्यांंनी दिल्या आहेत.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
तर या संतापाबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, इच्छा असणे आणि पूर्ण झाली नाही तर हे होणे स्वाभिविक आहे. मात्र राजकारणात फुलस्टॅाफ नसतो, राजकारणात कधीच काही संपत नाही, मानवी स्वभावात नाराजी ही स्विच सारखी नसते ऑन ऑफ करून जाते असे नाही. त्यामुळे त्याला वेळ लागेल, मात्र पंकजा ताई त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवतील, तसेच बीएल संतोष हे पंकजा मुंडे यांच्याशी बोलले आहेत तसेच मी आणि देवेंद्र फडणवीस देखील बोललो आहे. त्यांची नाराजी लगेच दूर होणार नाही पण भविष्यात विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रकांत पाटीलांनी दिली आहे.
तर महाविकास आघाडीकडूनही टीका
तर याच उमेदवारीवरून महाविकास आघाडीही आता भाजपला डिवचत आहे, भागवत कराड काय बोलतात तेच कळत नाही, मात्र पंकजा मुडेंना बाजूला ठेवायचा राजकीय डाव होता म्हणून भागवत कराडांना संधी मिळाली. गोपीनाथ मुंडेंचं त्याग, बलीदान भाजप विसरली, पंकजाचं नाव ना राज्यसभेवर आलं ना विधानपरिषदेवर, ही कोंडी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.