मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर 2024 ची निवडणूक भाजप स्वबळावर जिंकेल, असा नारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी व्यक्त केलाय. असाच विश्वास पक्षातील इतर नेत्यांकडूनही व्यक्त करण्यात येतोय. फडणवीसींच्या पत्नी अमृता फणवीसांनीही (Amruta Fadnvis) असाच दृढविश्वास व्यक्त केलाय. “अब देवेंद्र अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ हैं”, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.
राज्यसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसींच्या पत्नी अमृता फणवीसांनीही असाच दृढविश्वास व्यक्त केलाय. “अब देवेंद्र अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ हैं”, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.
राज्यसभा निवडणुकीनंतर अमृता फडणवीस यांनी भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय. “सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन. ज्या अपक्ष आमदारांनी भाजपला साथ दिली त्या सर्वांचे आभार. हा सत्याचा विजय आहे”, असं म्हणत अमृता यांनी पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिकांचं अभिनंदन केलं आहे.
ही शिवसेनेच्या पराभवाची नांदी आहे का? असा सवाल अमृता यांना विचारण्यात आला तेव्हा, “शिवसेनेचा खरा पराभव आता खरा सुरू होईल”, असं त्या म्हणाल्या.
राज्यसभा निवडणुकीचा तब्बल 9 तासांनंतर सस्पेन्स संपला आहे. या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली.राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांनाउमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.