‘बी टीम’ म्हणून हिणवणाऱ्या MIM च्या साथीने भाजपने शिवसेनेचा गेम केला?, वाचा सविस्तर…

Legislative Council elections 2022 : काँग्रेस, राष्ट्रवादी एमआयएमला सातत्याने भाजपची बी टीम म्हणून हिणवतं. त्यात ज्या एमआयएमवर पदोपदी टीका केली त्याच एमआयएमच्या दोन मतांसाठी महाविकास आघाडीला त्यांच्याशी हात मिळवणी करावी लागली. पण या सगळ्यात शिवसेनेचा गेम झाला का? वाचा सविस्तर...

'बी टीम' म्हणून हिणवणाऱ्या MIM च्या साथीने भाजपने शिवसेनेचा गेम केला?, वाचा सविस्तर...
उद्धव ठाकरे,असदुद्दीन ओवेसी, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:55 PM

मुंबई : राज्यसभेचा निकाल (Rajyasabha Election Results 2022) , त्याचे अर्थ, अपक्ष आमदारांवर राजकीय पक्षांची असणारी पकड याविषयी बोललं जात आहे. यात एक चर्चा आहे ती एमआयएमच्या 2 मतांची… एमआयएमची (MIM) मतं नक्की कुणाच्या पारड्यात पडली, याविषयी तर्क लावले जात आहेत. महाविकास आघाडीची गणितं पाहता, एमआयएमची दोन मतं थेट शिवसेनेला मिळाल्यास अडचण होऊ शकते त्यामुळे एमआयएमची दोन मतं काँग्रेसला द्यायची आणि काँग्रेसच्या दोन आमदारांनी शिवसेनेच्या संजय पवारांना मतदान करायचं असं गणित होतं. मात्र एमएयएमची मतं नक्की कुणाला पडली याबद्दल साशंकता आहे. ही मतं भाजपच्या (BJP) पारड्यात गेली असल्याचं बोललं जात आहे. तर भाजपने MIM च्या साथीने भाजपने शिवसेनेचा (Shivsena) गेम केला असल्याची चर्चा होत आहे.

MIM च्या साथीने भाजपकडून शिवसेनेचा गेम?

ज्या MIM ला सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘भाजपची बी टीम’ म्हणून हिणवलं त्यांचा आधार घेत शिवसेनेचा गेम झाल्याचं बोललं जात आहे. कारण इतर पक्षांनी जरी आपल्या आमदारांना व्हिप जारी केला असला तरी, एमआयएम आणि अपक्ष आमदारांची मतं कुणाला दिली जाणार यावर दोन्ही बाजूंनी अनिश्चितता होती. पण मतांची आकडेवारी पाहता MIM ची मतं भाजपकडे वळाली असल्याचं बोललं जातंय.

‘बी टीम’

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एमआयएमला सातत्याने भाजपची बी टीम म्हणून हिणवतं. पण सध्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र एकेका मतासाठी रस्सीखेच झाली. त्यात ज्या एमआयएमवर पदोपदी टीका केली त्याच एमआयएमच्या दोन मतांसाठी महाविकास आघाडीला त्यांच्याशी हात मिळवणी करावी लागली.

हे सुद्धा वाचा

भाजपची शांतीत क्रांती

एकीकडे सहाव्या जागेसाठी पुरेशी मतं असल्याचं भासवण्यात महाविकास आघाडी व्यस्त होती. तर दुसरीकडे भाजप अपक्षांची मनं आणि मतं आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील होतं. त्यातच त्यांनी एमआयएमलाही आपल्यकडे आकृष्ट करण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. त्याचमुळे ती दोन मतंही भाजपला मिळाल्याची चर्चा आहे. थोडक्यात काय तर, ‘बी टीम’ म्हणून हिणवणाऱ्या MIM च्या साथीने भाजपने शिवसेनेचा काटा काढला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.