“मविआच्या 170 वर आमचे 106 भारी! फडणवीसांनी मविआचा करेक्ट कार्यक्रम केला”, चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला टोला

Rajyasabha Election Results 2022 : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपचं अभिनंदन करतानाच राष्ट्रवादीला कोपरखळी मारली आहे. "मविआ 170 वर आमचे 106 भारी! फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला", असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

मविआच्या 170 वर आमचे 106 भारी! फडणवीसांनी मविआचा करेक्ट कार्यक्रम केला, चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला टोला
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 2:38 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. महाविकास आघाडीकडे भाजपपेक्षा जास्त आमदार असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे नेते मविआला हिणवताना दिसत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भाजपचं अभिनंदन करतानाच राष्ट्रवादीला (NCP) कोपरखळी मारली आहे. “मविआ 170 वर आमचे 106 भारी! फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला”, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. आमचे 106 त्यांच्या 170 वर भारी! जय हो…, असं ट्विट त्यांनी केलंय. तसंच “करेक्ट कार्यक्रम….अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणार्यांना दणदणीत उत्तर…”, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

करेक्ट कार्यक्रम!

जयंत पाटील यांचा एक डायलॉग प्रचंड प्रसिद्ध आहे. एका जाहीर मुलाखतीत बोलताना “योग्य वेळ पाहून आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो’, असं म्हटलं होतं. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. याच जयंत पाटलांच्या डायलॉगचा धागा धरत चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांसह राष्ट्रवादीला टोमणा लगावला आहे.

भाजपचा दणदणीत विजय

राज्यसभा निवडणुकीचा तब्बल 9 तासांनंतर सस्पेन्स संपला आहे. या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली.राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांनाउमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.