राज्यसभा निवडणूक जिंकल्याने कुणी मुख्यमंत्री होत नाही, काहीही झालं तरी महाराष्ट्र फडणवीसांना स्विकारणार नाही- दिपाली सय्यद
Rajyasabha Election Results 2022 : एक ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. "एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही, असं ट्विट दिपाली यांनी केलं आहे.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. यात भाजप विजयी झालाय. पण ही निवडणूक जिंकून मुख्यमंत्री होता येत नाही, असं म्हणत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी राज्यसभा निवडणुकीत जायंटकिलर ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) टोला लगावला आहे. एक ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. “एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही,एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही,एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही.106 काय 130 असु द्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही”, असं ट्विट दिपाली यांनी केलं आहे.
दिपाली यांचं ट्विट
ट्विटरच्या माध्यमातून दिपाली सय्यद यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. “एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही,एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही,एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही.106 काय 130 असु द्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही”, असं ट्विट दिपाली यांनी केलं आहे.
एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही,एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही,एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही.१०६काय१३०असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही.काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 11, 2022
राज्यसभा निवडणुकीचा तब्बल 9 तासांनंतर सस्पेन्स संपला आहे. या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली.राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांनाउमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.