Rajyasabha Election : हिंतेंद्र ठाकुरांच्या घरी शिवसेना नेत्यांनी चार तास मांडलं ठाण, 3 आमदारांचं मतदान कुणाला?

बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी कालच राजकीय बॉम्ब टाकत आपण आपली भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू असे सांगितले. त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजपकडूनही त्यांच्याकडे चर्चेच्या फैरी सुरू आहेत.

Rajyasabha Election : हिंतेंद्र ठाकुरांच्या घरी शिवसेना नेत्यांनी चार तास मांडलं ठाण,  3 आमदारांचं मतदान कुणाला?
महाविकास आघाडीच्या बैठकीला हितेंद्र ठाकुरांना आमंत्रण नाहीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 11:05 PM

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीने (Rajyasabha Election) पुन्हा राजकारणाऱ्यांना एकमेकांच्या उंबरे झिझवायची वेळी आणली आहे. जागा सहा आणि उमेदवार सात झाल्याने आता एका जागेसाठी अटीतटीची आणि प्रतिष्ठेची लढत होऊन बसली आहे. तिकडून शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात, सहावी जागा आमचीची निवडून येणार, तर भाजपही या जागेवर आपल्या विजयाचा दावा करत आहे. अशातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाल्याने भाजपचा एक मोठा नेता घरी अडकून पडलाय. तर दुसरीकडे मित्रपक्षांनी नाराजीचा सूर लावल्याने शिवसनेनेच्या गोटातलं टेन्शन वाढलं आहे. बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी कालच राजकीय बॉम्ब टाकत आपण आपली भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू असे सांगितले. त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजपकडूनही त्यांच्याकडे चर्चेच्या फैरी सुरू आहेत.

सेनेच्या नेत्यांची चार तास चर्चा

शिवसेना शिष्टमंडळ आणि बविआ चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यात 4 तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. मात्र बंद दाराआड झालेल्या चर्चेला यांनी कुटुंबिक चर्चेचे स्वरूप देत काय झाली चर्चा यावर मात्र बोलणे टाळले आहे. राज्यसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी सेना आणि भाजपाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिवसेनेकडून हिंतेंद्र ठाकूर यांची मनधरणी

या राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांना जास्त महत्व प्राप्त झाले असून, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांची मते वळविण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. काल भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी हितेंद्र ठाकूर यांची विरार मध्ये येऊन भेट घेतल्या नंतर आज शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, आणि खासदार राजन विचारे या दोघांच्या शिष्टमंडळाने विरार मध्ये येऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन शिवसेनेच्या उमेदवारास मत देण्याची विनंती केली आहे.

3 आमदारांची  मतं कुणाला?

हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना शिष्ठमंडळात तब्बल 4 तास बंद दाराआड चर्चा झाली असून, सव्वा चार वाजता आलेले शिष्ठमंडळ हे रात्री 8 वाजता निघाले आहे. या 4 तासाच्या चर्चेत शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत ही फोनवरून चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ च्या 3 आमदारांचे मत मागण्यांसाठी आलेले शिवसेना शिष्टमंडळ ने बंद दाराआड 4 तास चर्चा केली. मात्र राज्यसभा निवडणुकीवर आम्ही काही वेळच चर्चा केली आणि नंतर आम्ही फक्त कौटुंबिक चर्चा केली असल्याचे सर्वांनीच सांगितले आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.