Rajyasabha Election : वाघाच्या गुहेत जाऊन अपक्ष आमदार फोडण्याचा डाव? कृपाशंकर सिंह पुन्हा ट्रायडंटमध्ये आल्याने भुवया उंचावल्या

शिवसेनेला समर्थन देणारे तीन आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दवा हा भाजपकडून करण्यात येत आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवसेना आमदार, अपक्ष आमदार हे मुक्कामी असताना एका पाठोपाठ एक भाजपच्या नेत्यांनी ट्रायडेंटमध्ये येण्यास सुरुवात केल्याने वातावरण तापलं आहे.

Rajyasabha Election : वाघाच्या गुहेत जाऊन अपक्ष आमदार फोडण्याचा डाव? कृपाशंकर सिंह पुन्हा ट्रायडंटमध्ये आल्याने भुवया उंचावल्या
कृपाशंकर सिंह पुन्हा ट्रायडंटमध्ये आल्याने भुवया उंचावल्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 4:01 PM

मुंबई : भाजपचे नेते कृपा शंकर सिंह (Krupashankar Singh) पुन्हा ट्रायडेंटमध्ये (Hotel Triedent) दाखल झाल्याने अनेक सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागले आहेत. एका फॅमिली फंक्शनसाठी आलेले कृपा शंकर सिंह वारंवार ट्रायडेंटमध्ये दिसले आहेत. रुफ टॉपवर कार्यकर्मादर्म्यान ते कोणत्या आमदारास भेटले? याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कारण शिवसेनेला (Shivsena) समर्थन देणारे तीन आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दवा हा भाजपकडून करण्यात येत आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवसेना आमदार, अपक्ष आमदार हे मुक्कामी असताना एका पाठोपाठ एक भाजपच्या नेत्यांनी ट्रायडेंटमध्ये येण्यास सुरुवात केल्याने वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप हे दोघेही आपल्या विजयाचा दावा करत आहेत, मात्र गुलाल कुणाचा हे तर निवडणुकीनंतरच कळेल.

कृपाशंकर सिंह काय म्हणाले?

या भेटीगाठींच्या चर्चांबाबत कृपाशंकर सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, मी एका फंक्शनसाठी आलेलो आहे. शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी नाही. योगायोगाने आमदार जर भेटले तर त्यांना नमस्कार करेन आणि सांगेल आमचे उमेदवार महाडिकांना मतदान करा, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचं आमदारांसोबत बैठकसत्र सुरूच

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत बैठकसत्र सुरूच ठेवले आहे. त्यांनी अपक्ष आमदारांना आज आपल्या विभागातील कामांची यादी घेऊन मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं. यात किशोर जोरगेवार , आशिष जयस्वाल , चंद्रकात पाटील , विनोद निकोले यांना बोलावण्यात आलं होतं अशी माहिती समोर आला आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत आहे आणि महाविकास आघाडी उमेदवारांना मतदान करणार आहे. अपक्ष आमदारांची किंमत आता वाढली आहे. पण आमची कामे व्हावी ही आमची अपेक्षा आहे, तसेच आज संध्याकाळी सहा वाजता महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार आहे, अशी प्रतिक्रिया किशोर जोरगेवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

देशमुख, मलिकांच्या मतांचं काय होणार?

अटीतटीच्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते कमी होणार आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना उद्याच्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे. मलिक आणि देशमुख यांनी मतदानासाठी मागितलेली परवानगी कोर्टाने फेटाळली आहे. मलिक आणि देशमुखांवर टेरर फंडिग सारखे गंभीर आरोप असताना, त्यांना मतदानासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळू नये अशी भूमिका ईडीने घेतली होती. त्यावर कोर्टाने आज निर्णय घेत, या दोघांनाही परवानगी नाकराली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.