Rajyasabha MP Oath Ceremony | राज्यसभा खासदारांचा शपथविधी, उदयनराजेंची इंग्रजीत, पवारांची हिंदीत, चतुर्वेदींची मराठीत शपथ

उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

Rajyasabha MP Oath Ceremony | राज्यसभा खासदारांचा शपथविधी, उदयनराजेंची इंग्रजीत, पवारांची हिंदीत, चतुर्वेदींची मराठीत शपथ
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 12:15 PM

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली. (Rajyasabha MP Oath Ceremony)

महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली. त्यापैकी सहा जणांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला, मात्र त्या गैरहजर असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांना शपथ घेण्यासाठी बोलवण्यात आले.

हेही वाचा : राज्यसभा निवडणूक : निष्ठावंतांना डावललं, शिवसेना-भाजपची आयारामांवर भिस्त

काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप प्रवेश केलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजेंनी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ असा नारा दिला मात्र सदनात कोणत्याही घोषणा चालत नाहीत, हे यापुढे लक्षात ठेवा, अशी आठवण व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना करुन दिली.

दुसरीकडे, मध्य प्रदेशात झालेल्या सत्तापालट नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये सामील झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही खासदारकीची शपथ घेतली. तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचाही शपथविधी झाला

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिलला रिक्त झाल्या. यात महाविकास आघाडीला 4 जागा मिळणार होत्या. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा निश्चित झाल्यानंतर चौथ्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळाली होती. अखेर राष्ट्रवादीने शरद पवारांशिवाय फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं.

राज्यसभेच्या उमेदवारीवरुन चारही प्रमुख पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. भाजप पुरस्कृत रामदास आठवले यांच्याशिवाय पक्षाकडे दोन जागा होत्या. मात्र चर्चेतील नावांना मागे सारुन उदयनराजे भोसले आणि भागवत कराड यांना तिकीट देण्यात आले.

महाराष्ट्रातील सात खासदार

  1. उदयनराजे भोसले – भाजप
  2. भागवत कराड – भाजप
  3. रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
  4. शरद पवार – राष्ट्रवादी
  5. फौजिया खान – राष्ट्रवादी
  6. राजीव सातव – काँग्रेस
  7. प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना

(Rajyasabha MP Oath Ceremony)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.