एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईत, सभेत एकट्या पडलेल्या रक्षा खडसेंना अश्रू अनावर

जळगाव : भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि विद्यमान उमेदवार रक्षा खडसे यांना सभेत अश्रू अनावर झाले. त्यांचे सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईत आहेत. त्यांनी सभेला मोबाईलच्या माध्यमातून संबोधित केलं. पण भावूक झालेल्या सून रक्षा खडसे यांना अश्रू अनावर झाले. व्यासपीठावरच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि […]

एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईत, सभेत एकट्या पडलेल्या रक्षा खडसेंना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

जळगाव : भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि विद्यमान उमेदवार रक्षा खडसे यांना सभेत अश्रू अनावर झाले. त्यांचे सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईत आहेत. त्यांनी सभेला मोबाईलच्या माध्यमातून संबोधित केलं. पण भावूक झालेल्या सून रक्षा खडसे यांना अश्रू अनावर झाले. व्यासपीठावरच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांनी संपूर्ण मतदारसंघ गेल्या काही महिन्यांपासून पिंजून काढला आहे. रक्षा खडसे यांचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू समजली जाते. पतीच्या आत्महत्येनंतर रक्षा खडसे यांनी समर्थपणे राजकारण सांभाळलं. सासरे खडसे यांनी सूनेला थेट लोकसभेवर पाठवलं. पण सभेच्या वेळी सासरेच हजर नसल्याने रक्षा खडसे भावूक झाल्या होत्या.

2013 मध्ये रक्षा खडसे यांचे पती निखील खडसे यांनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली होती. रक्षा खडसे या स्थानिक पातळीवर 2010 पासूनच राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी सरपंच म्हणूनही काम पाहिलं. निखील यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या निवडून गेल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांचा सव्वा तीन लाख मतांनी पराभव केला होता. भाजपकडून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

2015 मध्ये रक्षा खडसे एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, लोकसभेत मी एकमेव अशी खासदार आहे, जी कुणाची तरी सून आहे. अन्यथा लोकसभेत कुणाची तरी मुलगी किंवा पत्नीच खासदार म्हणून दिसते. सासरे खडसे यांनी दिलेल्या आधाराबद्दल रक्षा खडसे नेहमी भावूक असतात. पतीच्या निधनानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जनसंपर्क प्रस्थापित करुन पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी केली आहे.

VIDEO : रक्षा खडसेंना अश्रू अनावर

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.