काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला ‘कॉर्नर’ करण्याचा प्रयत्न : राम कदम

बैठकांवर बैठका होत असताना सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्तास्थापन होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही, असं राम कदम म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला 'कॉर्नर' करण्याचा प्रयत्न : राम कदम
ram kadam
Follow us
| Updated on: Nov 20, 2019 | 12:42 PM

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला ‘कॉर्नर’ करण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा भाजप आमदार राम कदम यांनी केला. बैठकांवर बैठका होत असताना या तिन्ही पक्षांकडून सत्तास्थापन होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही, असंही कदम (Ram Kadam on Shivsena) म्हणाले.

‘गेल्या 28 दिवसांपासून तिन्ही पक्ष (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) एकामागून एक बैठका घेत असूनही कोणताही निष्कर्ष काढू शकलेले नाहीत, हे दुर्दैव आहे. त्यांच्या बैठका कधी संपणार?’ असा प्रश्न राम कदमांनी विचारला.

‘एकीकडे चर्चा सुरु असल्याचं दाखवलं जात आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते त्यास नकार देत आहेत’ असंही राम कदम म्हणतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला ‘कॉर्नर’ करण्याचा म्हणजेच कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, असं राम कदमांचं म्हणणं आहे.

‘त्यांच्याकडे कोणता अजेंडा नाही, कोणतीही योजना नाही. एक पक्ष किमान समान कार्यक्रम तयार असल्याचं कबूल करतो, तर दुसरा पक्ष ते खोडून काढतो. त्यांच्या विचारसरणी पूर्णपणे भिन्न आहेत आणि ते महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकत नाहीत’ असा दावाही राम कदम यांनी केला.

महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे

दरम्यान, शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाची माहिती देणार आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक आज संध्याकाळी दिल्लीत होत आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, तर काँग्रेसकडून अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची 10 जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मात्र महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पवारांनी सांगितलं.

Ram Kadam on Shivsena

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.