पवार कुटुंबाने पैसा वापरला, पण… : राम शिंदे

निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तरी गेल्या 50 वर्षात आपण काय योगदान दिलं, याचा विचार करुन विरोधकांनी इथे उमेदवारी भरायला पाहिजे होती, असं मत राम शिंदे यांनी व्यक्त केलं.

पवार कुटुंबाने पैसा वापरला, पण... : राम शिंदे
Follow us
| Updated on: Oct 23, 2019 | 2:59 PM

अहमदनगर : पवार कुटुंबाने मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला, मात्र सामान्य मतदार त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील, असा विश्वास अहमदनगरचे पालकमंत्री आणि भाजप उमेदवार राम शिंदे यांनी (Ram Shinde on Pawar Family) व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील लढतीमुळे कर्जत जामखेडकडे राज्यभराचं लक्ष लागून राहिलं आहे.

माझ्याविरोधात पवार कुटुंब होतं. मात्र आजपर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काहीही केलं नाही. त्यांनी फक्त पैश्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला. मात्र त्यांचा प्रयत्न लोक हाणून पाडतील आणि माझा विजय निश्चित करतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

धनशक्तीला परतवून लावण्याची ताकद माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. घटनेने निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तरी गेल्या 50 वर्षात आपण काय योगदान दिलं, याचा विचार करुन विरोधकांनी इथे उमेदवारी भरायला पाहिजे होती, असं मत राम शिंदे यांनी व्यक्त केलं.

दिवाळीनंतर अजित दादांसोबत मी विधानसभेत असेन : रोहित पवार

‘मतदानानंतर चोंडीमधील निवासस्थानी कुटुंबासोबत राहणंच मी पसंत केलं. अनेक कार्यकर्ते मला भेटायला येत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलं आहे’, असं राम शिंदे म्हणाले. प्रचारादरम्यान रोज मी केवळ दोनच तास झोपायचो. मात्र आता आराम करण्यापेक्षा कार्यकर्त्यांशी बोलणं, गप्पा मारणं, त्यांच्या उत्साहात भर टाकण्याकडे माझा कटाक्ष आहे. कारण कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टांपेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, असं राम शिंदे (Ram Shinde on Pawar Family) म्हणाले.

हा गड राखण्यासाठी माझा सर्वसामान्य कार्यकर्ता उभा राहिला असून माझा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला. मी लोणावळा किंवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊ शकलो असतो. पण मतदान झालं आणि निघून गेला, अशी भावना लोकांच्या मनात नको, असंही राम शिंदे म्हणाले.

राम शिंदेंना मंत्रिपदाची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये महाजनादेश यात्रेत बोलताना राम शिंदे यांना पुन्हा मंत्री करण्याची घोषणा केली होती. राम शिंदे यांना जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढं मोठं मंत्रिपद देऊ, असंही म्हटलं होतं.

फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडील जलसंधारण मंत्रालयाची धुरा राम शिंदेंकडे सोपवण्यात आली होती. तर अहमदनगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही राम शिंदेंकडे आहे. दुष्काळ असताना, चारा नसेल, तर जनावरं पाहुण्यांकडे सोडा, असं वक्तव्य केल्याने राम शिंदे टीकेचे धनी ठरले होते.

राम शिंदे हे अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे यांच्या घराण्यातील नववे वंशज आहेत.

पवारांची पुढची पिढी मैदानात

रोहित पवार सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. तसंच ‘बारामती अॅग्रो’च्या संचालकपदाची आणि इंडियन शुगर अँड मिल्स असोसिएशन (इस्मा)च्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. राज्यात दुष्काळी भागात रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबत दौरा केला होता.

रोहित पवार यांनी विधानसभा लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर मतदारसंघाची चाचपणी सुरु झाली होती. अखेर, राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांनी पाय रोवण्यास सुरुवात केली. या तालुक्यातील विविध गावात त्यांनी टँकरही सुरु केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले दिसले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.