महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार, अमित शाहांनी सांगितल्याचा आठवलेंचा दावा
काही काळजी नको, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार येणार, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना (Ramdas Aathvale discuss with Amit shah) सांगितले, असा दावा आठवलेंनी केला आहे.
नवी दिल्ली : काही काळजी नको, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार येणार, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना (Ramdas Aathvale discuss with Amit shah) सांगितले, असा दावा आठवलेंनी केला आहे. आज (17 नोव्हेंबर) रामदास आठवले आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. या चर्चेमध्ये शाह यांनी काळजी नको राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार येणार, असं म्हटलं, असं आठवलेंनी (Ramdas Aathvale discuss with Amit shah) सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
“सर्व ठिक होईल, काही काळजी नको, सरकार आपलेच येईल, असं भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी चर्चेत सांगितले”, असं रामदास आठवले म्हणाले.
सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे रामदास आठवले यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भाजप-शिवसेना युतीवर चर्चा केली. दरम्यान, आठवलेंनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याशीही चर्चा केली.
शिवसेनेला भाजपसोबत आल्याशिवाय पर्याय नाही आणि भाजपला शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याशिवाय पर्याय नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडावा, असा सल्लाही आठवलेंनी शिवसेनेला दिला.
“सध्या भाजपला बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची सत्तास्थापन करण्यााठी चर्चा सुरु आहे. या तिघांना किती यश येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या तिघांचे सरकार बनेल, असं मला वाटत नाही”, असेही रामदास आठवले म्हणाले.
“काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काही वरिष्ठ नेते शिवसेनेला कधी पाठिंबा देतील अस वाटत नाही, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याशिवाय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका बदलावी”, असंही आठवलेंनी सांगितले.