Ramdas Athavale | रामदास आठवले म्हणतात, अजूनही वेळ गेलेली नाही, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करता येईल, भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र यावी
शिवसेनेचे आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार नसेल तर त्यात फायदा भाजपलाच होणार आहे. त्यांनी आपले आमदार सांभाळले पाहिजे. मात्र काही आमदार परेशान आहेत. त्यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. त्यामुळे अजूनही त्यांनी भूमिका बदलायला हरकत नाही, असा आमचा सल्ला आहे, असंही आठवले यांनी सांगितलं.
नागपूर : खासदार रामदास आठवले आज नागपुरात होते. ते आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आज थेट राज्य सरकारला आवाहन केलं. ते म्हणाले, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमशक्ती सोबत शिवशक्ती म्हणजे शिवसेना एकत्र आणावी. असं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करता येईल. रामदास आठवले म्हणाले, अग्नीपथ (Agneepath) योजना हे सरकारने खूप मोठा विचार करून आणली आहे. यामध्ये चार वर्षे नोकरी केल्यानंतर जवान सेवानिवृत्त (retired) होणार आहे. पण जवानांमध्ये ( Jawan) याबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकार याच्यावर विचार करून काही बदल करता येतील, का याचासुद्धा विचार करेल. पण चुकीची धारणा ठेवू नये. लोकांना वाटत आहे की, चार वर्षाच्या नोकरीमध्ये काय होणार, अशा प्रकारचा गैरसमज निर्माण झाला आहे. याच्यामध्ये लाखो नवजवानांना नोकरी मिळणार आहे. संसदेत हा विषय आल्यानंतर त्याच्यावर आणखी विचार होऊ शकतो. वेगवेगळे दलांची भूमिका आहे. युवकांची भूमिका आहे हे जाणून घेतला जाईल. पण सरकारचा हा निर्णय घेताना चांगला विचार होता, असंही ते म्हणाले.
पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का
विधान परिषदेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला जाणार आहे. राज्यसभेत शिवसेनेचा एक उमेदवार निवडून येऊ शकला नाही. हा पहिला धक्का होता. विधान परिषदेत महाराष्ट्रात पाचवी जागा आहे. ती पाचवी जागा भाजप निवडून आणणार आहे. राज्यसभेला फडणवीसांनी आपली जादू चालवली. त्याचप्रमाणे आता इथे आपली जागा निवडून आणतील. अनेक अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देणार आहे. पाचवी जागा भाजपचे निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याचे काम होणार आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं
शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरे यांना आमचा सल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आणि भीमसेना एकत्र आली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. या राज्यांमध्ये सत्ताबदल करण्यात आली होती. मी त्यांना आवाहन करतो. बाळासाहेबांचं शिवशक्ती-भीमशक्ती स्वप्न साकार करण्याची अजून वेळ गेलेली नाही. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून देवेंद्र फडणवीसांसोबत आले पाहिजे. अडीच-अडीच वर्षाच्या फार्म्यूल्यावर सरकार स्थापन केले पाहिजे. नाहीच आले तर आमचं चाललेला आहे. 2024 मध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या जागा जिंकायचं आहे. ही आमची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.