Happy Birthday रामदास आठवले, राफेल ते राहुल, पन्नाशीनिमित्त आठवलेंच्या पाच भन्नाट कविता

| Updated on: Dec 25, 2019 | 1:23 PM

प्रचारसभांपासून राज्यसभेसारख्या सदनात भन्नाट विनोदी कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवण्यात रामदास आठवले यांचा हातखंडा आहे

Happy Birthday रामदास आठवले, राफेल ते राहुल, पन्नाशीनिमित्त आठवलेंच्या पाच भन्नाट कविता
Follow us on

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री, राज्यसभा खासदार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून रामदास आठवले नावाजलेले असले, तरी त्यांची खरी ओळख आहे ती त्यांच्या कवितांमधून. ‘र ला र’ आणि ‘ट ला ट’ जोडून केल्या जाणाऱ्या कविता खरं तर इतर वेळी चेष्टेचा विषय ठरतात. मात्र प्रचारसभांपासून राज्यसभेसारख्या सदनात अशाच कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवण्यात रामदास आठवले यांचा हातखंडा आहे. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची लोकसभेत घेतलेली गळाभेट असो किंवा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा अभिनंदन प्रस्ताव, आठवलेंना विषयाचं बंधन नाही. ‘मजबूत हो रही है मोदीजी की हील, राफेल में नहीं हुई कोई गलत डील’ अशी कविताही आठवलेंच्या मुखातून अवतरलेली. (Ramdas Athawale Birthday Special)

रामदास आठवले यांचं व्यक्तिमत्त्व निराळंच आहे. जितक्या त्यांच्या चारोळ्या गाजतात, तितकाच त्यांची फॅशन स्टेटमेंटही चर्चेचा विषय. केंद्राला हात पोहचले असूनही आठवलेंची नाळ आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जुळलेली आहे. रामदास आठवले यांची आज (25 डिसेंबर) पन्नाशी आहे. आठवलेंच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या पाच कविता.

1. लोकसभा निवडणुकांपूर्वी रामदास आठवले यांनी सदनात काँग्रेस आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना इशारा दिला होता. (9 जानेवारी 2019)

नरेंद्र मोदी कर रहे है देश का रक्षण,
2019 में हो जायेगा काँग्रेस का भक्षण,
राहुलजी, मोदीजी के साथ मत खेलो गलत चाल,
नहीं तो 2019 में हो जायेगा तुम्हारा बहुत बुरा हाल,
राफेल का मत फैलाओ हमारे सामने जाल,
नरेंद्र मोदीही जितेंगे 2019 का साल

2. व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी वर्णी लागल्यानंतर अभिनंदनरपर भाषणावेळी रामदास आठवले यांनी नायडूंची साथ देण्याची ग्वाही दिली होती.

व्यंकय्या नायडूजी को उपराष्ट्रपतीपद देकर नरेंद्र मोदी और अमित शाह ने रचा दिया है इतिहास,
क्योंकि व्यंकय्या नायडूजी थे बीजेपी के नेता खास,
आप के साथ मजबूतीसे खडा रहेगा ये आठवले रामदास,
क्योंकि मै हू सच्चा भीमदास,
बहुत मुश्किल है ये हाऊस को चलाना,
बहुतही कठीण है बीजेपी और काँग्रेस को मिलाना,
लेकिन हर बार मुझे बोलने के लिये बुलाना,
नहीं तो मुश्किल होगा आपको हाऊस को चलाना

3. राहुल गांधींनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर (20 जुलै 2018) रामदास आठवले यांनी त्याचं काव्यात्मक वर्णन केलं होतं.

राहुल गांधीजीने नरेंद्र मोदीजीके गलेको मिलाया गला,
लेकिन नरेंद्र मोदीजी के पास है काँग्रेसको हराने की कला,
काँग्रेसने पुरे किये थे सत्ता मे 50-51-55 साल,
तब उन्होंने कमाया बहुतही माल,
2014 में नरेंद्र मोदीजी ने किया था बहुतही बडा कमाल,
इसलिये देश में हो रहा है विकास का धमाल,
काँग्रेस का आज देश में नहीं है अच्छा हाल,

4. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर (9 जानेवारी 2019) रामदास आठवले यांनी राज्यसभेत हास्याच्या लकेरी उमटवल्या होत्या.

सवर्णोंमें भी थी गरीबीकी रेखा,
नरेंद्र मोदीजीने उसको देखा,
10 पर्सेंट आरक्षण देने का ले लिया मौका,
लेकिन 70 साल काँग्रेसने दिया सवर्णोंको धोका,
नरेंद्र मोदीजी कारवां आगे चला,
इसलिये गरीब सवर्णों का हुआ है भला,
नरेंद्र मोदीजी के साथ दोस्ती करनेकी है मेरे पास कला,
इसलिये काँग्रेस को छोडकर मै बीजेपी के पास चला,
सवर्णों को आरक्षण देकर मोदीजी ने मारा है छक्का,
और 2019 में उनका विजय है पक्का,
नरेंद्र मोदी और अमित शाहजी अगर मुझे देंगे थोडा धक्का,
तो मै काँग्रेस के खिलाफ मारता हू छक्का

5. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या निरोप समारंभाच्या भावूक प्रसंगीही रामदास आठवलेंच्या विनोदी कोपरखळ्या ऐकून सदनातील सदस्यांच्या डोळ्यात हसून हसून पाणी आलं.

आप जा रहे है यहा दस साल की यादों को छोडकर,
आप जा रहे सत्ताधारी और विरोधीयोंका दिल जोडकर,
आपने हम सभी का जित लिया था दिल,
इसलिये हमें बहुत हो रहा है फील,
नियमोंकी दिशा से हाऊस को चलाने वाले आप थे बडे विल,
इसलिये आपने पास कराये बहौतसे बिल,
मेरा छोटासा पक्ष,
लेकिन आपका हमेशा मेरे तरफ रहता था लक्ष,
आपने मजबूत किया था राज्यसभा का कक्ष,
इसलिये हम सभी सदस्य रहते थे दक्ष

Ramdas Athawale Birthday Special