मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात उद्धव ठाकरे कमी पडले, रामदास आठवलेंचा आरोप

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये," असेही रामदास आठवलेंनी सांगितले. (Ramdas Athawale  Comment On Various Political Topics) 

मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात उद्धव ठाकरे कमी पडले, रामदास आठवलेंचा आरोप
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 4:35 PM

नाशिक : “मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले आहेत,” असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. “आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण द्यावं. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये,” असेही रामदास आठवलेंनी सांगितले. (Ramdas Athawale  Comment On Various Political Topics)

“आरक्षण देण्याचं आमच्या मंत्रालयाच्या हातात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे वेगळी कॅटेगरी करुन द्यावं, ओबीसी मधून नाही,” असेही रामदास आठवले म्हणाले.

“माझं मंत्रालय अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच भटक्या विमुक्तांना सवलती देण्यासंदर्भात आमचा विचार सुरु आहे. त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाऊंटवर स्कॉलरशिप देऊ,” असेही रामदास आठवलेंनी सांगितले.

“औरंगाबादच्या नामांतरावरुन सरकार पडण्याची चिन्हं”

“औरंगाबाद नामांतर करुन आमचा संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. त्या विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचं नावं द्यावं. औरंगाबादचे नामांतर करण्याची अवश्यकता नाही. मात्र आता निवडणुका आल्यामुळे सर्व सुरू झालं आहे. यापूर्वी हे का केलं नाही?” असा सवालही आठवलेंनी उपस्थित केला आहे.

“शिवसेनेने जास्त आग्रह केला तर काँग्रेस सोडून जाईल. त्यामुळे सध्या तरी नावं बदलू नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला. औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यावरुन सध्या सरकार पडण्याची चिन्ह आहेत. यावरुन सध्या संघर्ष सुरू आहे. सरकार कोसळेल आणि देवेंद्र फडणवीस यांच सरकार येईल,” असेही रामदास आठवले म्हणाले.

“काँग्रेसने पुनर्विचार करावा” 

“काँग्रेसचा वेळोवेळी अपमान झाला आहे. त्यामुळे त्यांनी पुनर्विचार करावा. शिवसेना खासदार संजय राऊत हे यूपीएच वारंवार नावं पुढे करतात. मात्र जर शरद पवार यांना मिळालं तर चांगलच आहे, पण सोनिया गांधी असल्यामुळे त्यांना मिळणार नाही,” असेही आठवले म्हणाले.

“ईडीची चौकशी पेपर बघून”

“ईडीचा आणि आमचा काही संबंध नाही. ईडी ही पेपर बघून चौकशी करते. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. ईडीची चौकशी होऊ नये यासाठी माझ्यासारखं काम करावं. चांगलं काम करून पैसे कमवा. व्यवहार चांगले करा. पेपरमध्ये हेराफेरी केली असेल पण मारामारी करू नका,” असेही आठवलेंनी सांगितले.

“शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला समजतात” 

“कोरोना काळात इकॉनॉमी खालावली आहे. यंदाचं अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली जाईल. शेतकरी हा महत्वाचा आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं. इतके दिवस आंदोलन करू नये. त्यांच्या भावना आम्हाला समजतात. इतक्या थंडीत ते आहेत. शेतकरी नेत्यांची मार्ग काढण्यास तयारी नाही,” असेही रामदास आठवले म्हणाले

“कायदे मागे घ्या, मग पार्लमेंटला काम राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही, ते दोन वेळा पंतप्रधान झाले. कायद्यात बद्दल करण्यास सरकार तयार आहे. मात्र कायदा मागे घेणं शक्य नाही,” असेही आठवलेंनी सांगितले.

“येत्या निवडणुकीत भाजप आणि आरपीआय एकत्र राहू. आम्हाला आमच्या ताकदीप्रमाणे जागा मिळाव्यात. नाशिकमध्ये आम्ही भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवू,” असेही रामदास आठवले यांनी सांगितले.  (Ramdas Athawale  Comment On Various Political Topics)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई महापालिका एकत्रच लढायची, आमची भूमिका स्पष्ट, राष्ट्रवादीने काँग्रेसला ठणकावलं!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.