खडसेंनी राष्ट्रवादीत आधीच जायला हवं होतं, आता ‘रिपाइं’त या, सरकार आणू : आठवले
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. जायचं होतं, तर त्यांनी आधी जायला हवं होतं, ते मंत्री झाले असते. आता सगळं फुल्ल आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चा असतानाच रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या पक्षात त्यांना आवताण दिलं आहे. खडसेंनी राष्ट्रवादीत आधीच जायला हवं होतं, मात्र आता त्यांनी ‘रिपाइं’मध्ये यावं, सरकार आणू, असं निमंत्रण आठवलेंनी दिलं. (Ramdas Athawale invites Eknath Khadse in RPI)
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. जायचं होतं, तर त्यांनी आधी जायला हवं होतं, ते मंत्री झाले असते. आता सगळं फुल्ल आहे. राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा त्यांनी ‘रिपाइं’मध्ये यावं, आपण आपले सरकार आणू, असे रामदास आठवले म्हणाले.
सह्याद्री गेस्ट हाऊसवर 6 डिसेंबरसाठी बैठक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाली. चैत्यभूमीची डागडुजी करण्याची मागणी आम्ही करत आहोतच. आतापर्यंत सर्व सण सगळ्यांनी घरामध्ये साजरे केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर येऊ नये. दादरमध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत असल्याने अनुयायांनी बाहेरुन मुंबईला येणं धोक्याचं आहे. त्याऐवजी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी, असं अधिकाऱ्यांना सांगितल्याचं आठवले म्हणाले.
दसरा, नवरात्रीबाबत जशी नियमावली तयार केली आहे, तशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियमावली बनवावी. ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत तिथे हार घालावा, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं.
हाथरसमध्ये जाऊन मी त्या पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि पाच लाखांची मदत केली आहे. योगी सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. त्या घटनेत पीडित तरुणीची मान आणि मणका तुटलेला होता. अशा घटनांचे राजकरण करु नये. राजस्थानमध्ये अशा घटना होत असताना राहुल गांधी का आंदोलन करत नाहीत? असा सवाल रामदास आठवलेंनी विचारला.
‘नटींच्या भीडमध्ये नाही, कार्यकर्त्यांच्या गर्दीत’
“मी कंगनाला मानवतेच्या दृष्टीने विचार करुन पाठिंबा दिला होता, कंगना जे बोलली, त्याचं समर्थन केलेलं नाही. मी नटींच्या भीडमध्ये नाही राहत, मी कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहतो, असा टोलाही आठवलेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. हाथरसमध्ये मी जाऊन आलो, तुम्ही कधी जाणार आहात? असा सवालही त्यांनी विचारला. संजय राऊत यांनी अशा प्रकारची वक्तव्यं करु नयेत, ते माझे मित्र आहेत, असं सांगायला ते विसरले नाहीत.
‘शरद पवारांना उत्तर देणार नाही’
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगले मित्र आहेत. मी जी भूमिका मांडतो, ती गांभीर्यांने घेतात. त्यामुळे पवार साहेबांना मी काही उत्तर देणार नाही. कोणाला माझी भूमिका आवडत असेल नसेल, असे आठवले म्हणाले. (Ramdas Athawale invites Eknath Khadse in RPI)
‘सुशांतची हत्या झाली असं एम्स म्हणू शकत नाही’
‘अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बाबतीत अनेक प्रश्न समोर होते. सीबीआयच्या हातीसुद्धा काही मिळत नाही. ‘एम्स’चा रिपोर्ट आला, याबाबत एम्स हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही. आम्ही सरकारबाबत कोणतीही रणनीती केली नाही. मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, मात्र तपास धीम्या गतीने सुरु आहे. आम्ही सरकारच्या विरोधात काही केले नाही. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आम्ही कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. आम्ही सरकारला बदनाम करण्याचे काम केले नाही. रियाला जामीन मिळाला ठीक आहे. मात्र इंडस्ट्रीत ड्रग्जचा वापर करु नये’ असंही आठवले म्हणाले. फेक अकाउंटचा तपास करावा, तुम्ही तुमची चाल खेळताय, आम्ही आमची खेळू, पण आम्हीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
VIDEO : 4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 7 October 2020https://t.co/V2gMdEGgLR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2020
संबंधित बातम्या :
एकनाथ खडसे ‘घड्याळाची वेळ’ साधण्याची चिन्हं, 10-10 च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश?
(Ramdas Athawale invites Eknath Khadse in RPI)