Ramdas Athawale : रामदास आठवले पुन्हा शिर्डीतून निवडणूक लढण्यास उत्सुक, संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेल
खोके बाकी सगळे ओके मारा तुम्ही आता छक्के असा टोला रामदास आठवले यांनी विरोधकांना लगावला आहे. या आरोपात तथ्य नसून आरोप करण्याचा सर्वांना अधिकार आहे.
शिर्डी : शिर्डी (Shirdi) लोकसभेत पुन्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) लढण्यास इच्छुक असल्याचं स्वतः आठवले यांनी बोलून दाखवलं आहे. ते अहमदनगर (Ahmadnagar) मध्ये पत्रकारांशी बोल होते. तर शिर्डीच्या जागेवरून एकदा मी हरलो तर मी पुन्हा इच्छुक आहे. कारण मी लोकसभेचा माणूस आहे. पुन्हा माझा विचार झाला तर शिर्डीत नव्हे तर नगर जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या मंत्री पदाचा उपयोग करता येईल असं आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच मला अनेक लोकांचे फोन येतात त्यावेळेला आमची चूक झाली, तर आता माझे प्रामाणिक इच्छा आहे मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
लढायचं असेल तर शिर्डीतूनच लढायचं आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीस माझा विचार केला तर नक्कीच मी विचार करेल. लढायचं असेल तर शिर्डीतूनच लढायचं आहे पडायचं नाही असं मिस्कील वक्तव्य आठवले यांनी केला आहे. तसेच त्यावेळी नगरची जागा बाळासाहेब विखे यांना दिली असती तर तीही आणि माझी जागा निवडून आली असती असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. तर बाळासाहेब विखे यांची इच्छा होती मी शिर्डीतून लढावी जेणेकरून त्यांना नगरची मिळेल पण राष्ट्रवादीने नकार दिला. त्यामुळे माझ्या जागेला पाठिंबा मिळाला नाही अस ते म्हणाले आहे.
अपघात बद्दल आमच्या मनात अजूनही शंका आहे
खोके बाकी सगळे ओके मारा तुम्ही आता छक्के असा टोला रामदास आठवले यांनी विरोधकांना लगावला आहे. या आरोपात तथ्य नसून आरोप करण्याचा सर्वांना अधिकार आहे. उद्धव ठाकरेंना आमदार संभळता आले नाही अशी टीका त्यांनी केलीये. तर बाळासाहेबांच्या फोटोबद्दल हा माझाच अधिकार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा भक्त निधन झालं मात्र अपघात बद्दल आमच्या मनात अजूनही शंका आहे. त्यामुळे मेटे यांच्या अपघाताची चौकशी सीआयडी मार्फत व्हावी हा अपघात होता. की अपघात घडवण्यात आला आहे याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.