आधी पटोलेंच्या भूमिकेला विरोध, आता रामदास आठवले थेट बिग बींची भेट घेणार

रामदास आठवले लवकरच बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेणार आहेत. (Ramdas Athawale Meet Amitabh Bachchan) 

आधी पटोलेंच्या भूमिकेला विरोध, आता रामदास आठवले थेट बिग बींची भेट घेणार
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 4:28 PM

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात गुंडाराज नाही. त्यामुळे तुम्ही असे विधान करु शकत नाही. जर तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शुटींग बंद करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. (Ramdas Athawale Meet Amitabh Bachchan)

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रामध्ये शूटिंग करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. नाना पटोले यांच्या या भूमिकेला रामदास आठवलेंनी विरोध दर्शवला आहे. जर तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शूटींग बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येतील, असे आठवलेंनी सांगितले. तसेच याच पार्श्वभूमीवर आठवले अमिताभ बच्चन यांची भेट घेणार आहेत. ही भेट नेमकी कधी होणार याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला 25 जागा मिळाल्या पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तसा प्रस्ताव आम्ही भाजपाकडे ठेवला आहे. शेवटी आम्हाला 6 ते 7 जागा मिळाल्या पाहिजे, अशी अपेक्षा आठवलेंनी केली आहे.

येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, असेही आठवलेंनी यावेळी जाहीर केले.

नाना पटोले काय म्हणाले होते?

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचावर टीका केली होती. नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या जुन्या ट्विटची आठवण करुन दिली होती. बच्चन आणि कुमार यांचे सिनेमे व शूटिंग महाराष्ट्रात चालू न देण्याचा इशारा देत ते बंद पाडण्याची ताकीद त्यांनी दिली होती. यानंतर नाना पटोलेंवर भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत भाजप हे सेलिब्रटीचा वापर करीत असल्याचा आरोप केला. मनमोहन सिंग सरकार कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव जास्त असताना सरकारने पेट्रोल व डिझल चे भाव वाढविले नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असताना सुद्धा मोदी सरकार जनसामान्यांचे खिसे कापण्याचे काम करीत आहे, असा आरोप केला होता.

अभिताभ बच्चन व अक्षय कुमार यांनी मनमोहन सिंग सरकार वर टीका करत थट्टा केली होती. मात्र, ते अभिनेते आज का गप्प आहेत,सेलिब्रेटी हे कुठल्या पक्षाचे नसून जनसामान्यांचे असतात त्याचा वक्तव्याचा जनमानसात प्रभाव पडत असतो. मात्र, ते आज वास्तविकता मांडत असताना दिसत नाहीत, अशा डुप्लिकेट व डबल स्टॅडर्स अभिनेत्यांना धडा शिकविणे हा लोकशाही चा सगळ्यात चांगला मार्ग आहे. हे माझे मत नसून काँग्रेस पक्षाचे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Ramdas Athawale Meet Amitabh Bachchan)

संबंधित बातम्या : 

लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात, नवरदेवासह बाप, भाऊ-भावजय पॉझिटिव्ह, वऱ्हाडी क्वारन्टाईन!

सावधानता बाळगा अन्यथा कोरोना पुन्हा येईल; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.