Ramdas Athawale : ‘ब्राह्मण मुख्यमंत्री हवा…’ रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला रामदास आठवलेंचाही पाठिंबा; फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक

'मी ब्राह्मण व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो', असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. त्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही मोठं आणि महत्वाचं वक्तव्य केलंय.

Ramdas Athawale : 'ब्राह्मण मुख्यमंत्री हवा...' रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला रामदास आठवलेंचाही पाठिंबा; फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 9:54 PM

ठाणे : ‘मी ब्राह्मण व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून पाहू इच्छितो’, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं होतं. त्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही मोठं आणि महत्वाचं वक्तव्य केलंय. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं आठवले म्हणालेत. इतकंच नाही तर आठवले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलंय. रामदास आठवले आज ठाण्यात बोलत होते. आठवले म्हणाले की, ‘आम्हाला सरकार पाडायचं नाही. मात्र, सरकार पडलं तर आम्हाला सरकार बनवायचं आहे. आमची 2024 ची तयारी सुरु आहे. 2024 मध्ये आम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री हवा, अशाप्रकारचं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं होतं. दानवे यांच्या मताला माझा पूर्ण पाठिंबा आहे’.

रामदास आठवले यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलंय. मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वेळा राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण जरी असले तरी बहुजनांचे नेते आहेत, मागासवर्गीयांचे नेते आहेत, असंही आठवले यावेळी म्हणाले. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणारच आहेत. अडीच वर्षे झाली आहेत, उरलेली अडीच वर्षे घालवायची आहेत. मग पुन्हा देवेंद्र फडणवीस येणारत आहेत. पण मध्ये काही गडबड झाली की आम्ही आलोच, असंही आठवले यांनी म्हटलंय.

रावसाहेब दानवे मुख्यमंत्रीपदाबाबत नेमकं काय म्हणाले होते?

रावसाहेब दानवे हे 3 मे रोजी परशुराम जयंती निमित्त जालना येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, ‘मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम देखील ब्राम्हण समाजाने केले’, असं रानवे म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

तृतीयपंथीयही मुख्यमंत्री होऊ शकतो – अजित पवार

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ‘मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं, हे कुणीही होऊ शकतं. तृतीयपंथीयही मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्या जाती धर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते. महिलाही मुख्यमंत्री होऊ शकते, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145 चं बहुमत आणा आणि राज्याचं प्रमुख व्हा. असं कुणी काहीही सांगेन, की अमक्याने व्हावं, तमक्याने व्हावं. अरे त्यांनी 145 आमदार त्यांच्या पाठिशी उभे केले तर होतील ना ते मुख्यमंत्री किंवा ती व्यक्ती’, असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.