‘ये’ मोदी और मेरे अंदर की बात है : रामदास आठवले

| Updated on: Mar 03, 2020 | 8:32 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मोदींना भेटतात. त्यांची लोकप्रियता वाढत आहे, अशा शब्दात आठवलेंनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

ये मोदी और मेरे अंदर की बात है : रामदास आठवले
Follow us on

नाशिक : जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असं गंमतीशीर विधान करत केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा खसखस पिकवली. (Ramdas Athawale praises Narendra Modi)

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत रामदास आठवले बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर देशाचं संविधान कसं असतं सांगता येत नाही, असं म्हणत आठवलेंनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला.

विरोधी पक्षातील नेत्यांचा तोल गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते विरोध करतात असं म्हणत आठवलेंनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. CAA बाबत मुस्लिम समाजातील नागरिकांना काही अडचण असेल, तर मी त्यांच्या पाठीमागे उभा राहीन, अशी भूमिकाही आठवलेंनी घेतली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मोदींना भेटतात. त्यांची लोकप्रियता वाढत आहे, अशा शब्दात आठवलेंनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

सरकार आणणाऱ्या राऊतांवर अन्याय, संपादकपद तरी द्यायचं : आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच सोशल मीडियावरुन संन्यास घेण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यामुळे आठवलेंनी बेडक्या फुगवून दाखवल्या असल्या, तरी ही नेमकी ‘अंदर की बात’ काय आहे? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. (Ramdas Athawale praises Narendra Modi)

दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ मनसे आणि भाजपनेही ‘औरंगाबाद’ शहराचे ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा आग्रह धरला असतानाच भाजपच्या मित्रपक्षाचा मात्र विरोधाचा सूर आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला होता.

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध आहे. कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटतं, असं रामदास आठवले रविवारी म्हणाले होते. एकीकडे नरेंद्र मोदींचे गोडवे आठवले गात असतानाच राज्यातील भाजपच्या भूमिकेला मात्र त्यांनी विरोध दर्शवल्याचं चित्र आहे. (Ramdas Athawale praises Narendra Modi)