अमिताभ बच्चन के सन्मान मे आरपीआय मैदान में, नाना पटोलेंच्या धमकीला भीक घालत नाही: रामदास आठवले

अमिताभ बच्चन तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. (Ramdas Athawale Support Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन के सन्मान मे आरपीआय मैदान में, नाना पटोलेंच्या धमकीला भीक घालत नाही: रामदास आठवले
रामदास आठवले, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 5:51 PM

पालघर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भूमिकेला विरोध केला आहे. ते पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे बोलत होते. अमिताभ बच्चन तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. (Ramdas Athawale slams Nana Patole over statement on Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है

रामदास आठवले यांनी अमिताभ बच्चन यांना पाठिंबा दर्शवत, अमिताभ बच्चन के सन्मान मे आरपीआय मैदान मे, असं म्हटलं. आरपीआयचे कार्यकर्ते जमा होऊन त्यांना अमिताभ बच्चन यांना पाठिंबात देतील. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर दबाव आणला जात असेल तर आरपीआय त्यांना संरक्षण देईल, असं आठवले म्हणाले. नाना पटोले यांनी त्यांची भूमिका बदलावी, असंही त्यांनी आवाहन केले.

आरपीआयचा मोर्चा

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रामध्ये शूटिंग करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. आरपीआयनं अमिताभ बच्चन यांचा समर्थनार्थ जुहू जलसा बंगलाच्या समोर मोर्चा काढून अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे समर्थन केले. आरपीयआयच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

नाना पटोले काय म्हणाले होते?

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचावर टीका केली होती. नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या जुन्या ट्विटची आठवण करुन दिली होती. बच्चन आणि कुमार यांचे सिनेमे व शूटिंग महाराष्ट्रात चालू न देण्याचा इशारा देत ते बंद पाडण्याची ताकीद त्यांनी दिली होती. यानंतर नाना पटोलेंवर भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत भाजप हे सेलिब्रटीचा वापर करीत असल्याचा आरोप केला. मनमोहन सिंग सरकार कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव जास्त असताना सरकारने पेट्रोल व डिझल चे भाव वाढविले नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असताना सुद्धा मोदी सरकार जनसामान्यांचे खिसे कापण्याचे काम करीत आहे, असा आरोप केला होता.

अभिताभ बच्चन व अक्षय कुमार यांनी मनमोहन सिंग सरकार वर टीका करत थट्टा केली होती. मात्र, ते अभिनेते आज का गप्प आहेत,सेलिब्रेटी हे कुठल्या पक्षाचे नसून जनसामान्यांचे असतात त्याचा वक्तव्याचा जनमानसात प्रभाव पडत असतो. मात्र, ते आज वास्तविकता मांडत असताना दिसत नाहीत, अशा डुप्लिकेट व डबल स्टॅडर्स अभिनेत्यांना धडा शिकविणे हा लोकशाही चा सगळ्यात चांगला मार्ग आहे. हे माझे मत नसून काँग्रेस पक्षाचे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या: 

ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार, काँग्रेस पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार : रामदास आठवले

अमिताभ बच्चन यांनी विरानुष्काच्या मुलीवर केलं ट्वीट, घराणेशाहीचा आरोप करत नेटकरी भडकले

(Ramdas Athawale slams Nana Patole over statement on Amitabh Bachchan)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.