दोन पक्षातली प्रकरणं बाहेर आली, आता तिसऱ्या पक्षाची वेळ : रामदास आठवले

धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्याविषयी प्रश्न विचारला असता रामदास आठवले यांनी मिश्कीलपणे हे भाष्य केलं (Ramdas Athawale Sanjay Rathod Thackeray Govt)

दोन पक्षातली प्रकरणं बाहेर आली, आता तिसऱ्या पक्षाची वेळ : रामदास आठवले
संजय राठोड, धनंजय मुंडे, रामदास आठवले
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 4:57 PM

नांदेड : सरकारमधील दोन पक्षातली प्रकरणं बाहेर आली आहेत, तिसऱ्या पक्षातील प्रकरण लवकरच बाहेर येईल, असा सूचक इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच वनमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविषयी आठवले भाष्य करत होते. (Ramdas Athawale talks on Sanjay Rathod Dhananjay Munde Thackeray Govt)

“तिसऱ्या पक्षातील प्रकरणही बाहेर येईल”

“राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. सध्या दोन पक्षातील प्रकरणं बाहेर आली आहेत. तिसऱ्या पक्षातील प्रकरणही लवकरच बाहेर येईल” असा दावा रामदास आठवले यांनी केला. धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्याविषयी प्रश्न विचारला असता रामदास आठवले यांनी मिश्कीलपणे हे भाष्य केलं. आठवले नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“उद्धव ठाकरे मवाळ झाले”

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकल्यामुळे ते मवाळ झाले आहेत, अशी टीकाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असंही आठवले म्हणाले.

अमिताभ-अक्षयकुमारला संरक्षण देणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचं चित्रीकरण करू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतली. “नाना पटोले यांनी दिलेल्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचं चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं संरक्षण करेल. त्यांच्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल,” अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती.

संबंधित बातम्या :

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले

आरपीआयच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते लिफ्टमध्ये अडकले, रामदास आठवलेंनी उचललं ‘हे’ पाऊल

(Ramdas Athawale talks on Sanjay Rathod Dhananjay Munde Thackeray Govt)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.