विनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दहा वेळा जरी आयोध्येला गेले तरी राम मंदीर होणार जाणार नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अठावले यांनी लगावला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. “उद्धव ठाकरे हे याआधी आयोध्याला गेले होते. पुन्हा पुन्हा आयोध्याला जाण्याची गरज नाही. राम मंदीर कायदेशीर मार्गाने बांधले जावं. बेकायदेशीर राम मंदीरला आमचा विरोध आहे. राम मंदीर सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानुसार बांधायला हवं”, असं रामदास आठवले म्हणाले.
उद्धव ठाकरे 16 जून रोजी अयोध्येत
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 16 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. तिथे ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबतचं ट्विट केलं आहे.
लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांसह अयोध्येत गेले होते. ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणाही याआधी उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, भाजपशी युती झाली आणि उद्धव ठाकरे घोषणा विसरुन, निवडणुकीच्या कामाला लागले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागीही झाली.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जूनला अयोध्येत जाऊन काय बोलतात, राम मंदिराबाबत काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या