कोरोना गो-गोप्रमाणे महाविकासआघाडी गो-गो म्हणावं लागेल : रामदास आठवले
भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना गो, कोरोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे (Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go).
मुंबई : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना गो, कोरोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे (Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go). त्यांनी कोरोना गोसोबतच आता महाविकासआघाडी गो-गोचा नाराही दिला आहे. तसेच मध्यप्रदेशातील व्हायरस महाराष्ट्रातही यावं असंही म्हटलं.
रामदास आठवले म्हणाले, “मी कोरोना गो असं म्हटलं आहे. कोरोना महाराष्ट्रात किंवा भारतात जास्त आलेला नाही. तरीही आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. त्याची काळजी घेण्याची जबाबदारी डॉक्टरांसोबत आपल्यावर आहे. कोरोना आपल्यात, आपल्या गावात, आपल्या देशात यायला नको. यासाठी जी काळजी घ्यायला हवी ती घेतली पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत कोरोना गो कोरोना गो असं आम्ही म्हणत राहणार आहोत. मात्र, कोरोना गो म्हणत असताना महाविकास आघाडी गो-गो असं आम्हाला म्हणावं लागेल.”
उद्धव ठाकरेंना हेच सांगणं आहे की त्यांनी काँग्रेस-राष्ट्रावादीच्या चक्रव्युहात जास्त अडकू नये. आपली परंपरा, विचारधारा पाहता बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असेल, तर आपण पुन्हा भाजपमध्ये आलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि आरपीआयचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. आपण आला नाही, तर भूकंप होण्याची शक्यता आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
“मध्य प्रदेशमधील व्हायरस महाराष्ट्रातही यावा”
रामदास आठवले म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे हे महाराष्ट्रातीलच आहेत. ते मराठी भाषिक आहेत. ते भाजपमध्ये आले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आता मध्य प्रदेशचा जो व्हायरस आहे, तो महाराष्ट्रातही आला पाहिजे. महाराष्ट्रात असा भूकंप होणं आवश्यक आहे. शरद पवार असा भूकंप होणार नाही असं म्हणत असले तरी भूकंप कधी होतो हे लक्षात येत नाही. भूकंप अचानक होतो. त्यामुळे महाराष्ट्रात देखील भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही.”
संबंधित बातम्या:
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही भूकंप होणार : रामदास आठवले
Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go