Ramdas Kadam : मी बोललो तर राजकारणात भूकंप होईल, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा
माझ्या सारख्या माणसावर कोण आरोप करेल. यांची हिंमत काय आहे. कोण अरविंद सावंत आणि कोण तो विनायक राऊत हो. त्यांची औकात आहे का माझ्यावर बोलायची.

मुंबई – मागील महिन्यांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय घडामोडी एकदम जलद गतीने सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते (Shivsena) अस्वस्थ आहेत. फुटलेल्या शिंदे गटात रोज कार्यकर्ते भरती होत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नुकतीच शिवसेनेच्या नेत्यांवरती जोरदार टीका केली. “शेवटी पक्षात फूट पडलीच ना, शिंदेंनी बंड केलं नसतं तर पुढच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात दहा आमदारही निवडून आले नसते. मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. शिंदे गुवाहाटीला असताना मी प्रयत्न केला होता. माझ्या प्रयत्नाला यश आलं होतं. शिंदे म्हणाले, उद्धवजींना सांगा राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही मातोश्रीत येतो. पण पवार मातोश्रीत गेले. त्यांनी काही तरी गुरुकिल्ली दिली, आणि पुन्हा सगळं वाया गेल्याची खंत रामदास कदम यांनी आज बोलून दाखवली. नंतर कायदेशीर कारवाई सुरु झाल्याची देखील त्यांनी सांगितले.
मी बोललो तर राजकारणात भूकंप होईल
“माझ्या सारख्या माणसावर कोण आरोप करेल. यांची हिंमत काय आहे. कोण अरविंद सावंत आणि कोण तो विनायक राऊत हो. त्यांची औकात आहे का माझ्यावर बोलायची. त्यांची औकात आहे का. योगदान दिलंय 52 वर्ष. अंगावर अनेक केसेस घेतल्या, तुरुंगात गेलो. यांची औकात आहे का माझ्यावर बोलायची. 2005 मध्ये बाळासाहेबांनी बेळगावला पाठवलं होतं. गुन्हा दाखल झाला होता. त्याचा कालच दहा लाखाचा जामीन घेतला. हे काय मला पक्ष शिकवत आहेत. शिवसेनेसाठी जीवाचं रान करणारा आहे मी. माझा मर्डर करण्यासाठी सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. बायका मुलं नव्हती का आम्हाला. कोण अरविंद सावंत…त्यांची औकात आहे का माझ्या समोर. आमदार जातात, फूट पडली. ही मिलीभगत आहे का. मीडिया दिसतो म्हणून तोंडाला वाटेल ते बोलायचं.” अशी टीका रामदास कदमांनी अरविंद सावंत यांच्यावरती केली.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वाढली पाहिजे
“भविष्यात माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल बाळासाहेबांची शिवसेना अभेद्य राहिली पाहिजे. पुन्हा भगवा फडकला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वाढली पाहिजे. आता मी महाराष्ट्राच्या बाहेर पडणार. जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे मी दौरे करणार. उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती आहे की मी नाईलाजाने मी राजीनामा दिला. मला समाधान नाही. माझ्या मुळावरच तुम्ही उठला. माझ्या मुलाला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायला निघाला. आताही मी उठत आहे. मी फार संयम पाळला आहे. प्रचंड संयम पाळला आहे. मी काय चूक केली. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी नाही बोलणार. मी बोललो तर भूकंप होईल. मला तुटलेल्या गोष्टी जोडायच्या आहेत. तो प्रयत्न मी करणार आहे.”