Ramdas Kadam : स्वतंत्र पक्ष नकोच, मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार, शिंदे गटातील रामदास कदम स्पष्टच म्हणाले..

ज्या दिवशी तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीला सोडून परत याल, त्या दिवशी तुम्ही आमचे नेते आपोआप व्हाल असेही रामदास कदम म्हणालेत, तर नवा पक्ष नकोच, मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार आणि भगव्यातच जाणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

Ramdas Kadam : स्वतंत्र पक्ष नकोच, मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार, शिंदे गटातील रामदास कदम स्पष्टच म्हणाले..
ठाकरेंवर रामदास कदमांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 5:01 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Ekanath Shinde) यांचं बंड झाल्यापासून आणि त्यांच्यासोबत पन्नास आमदार गेल्यापासून एकीकडून आदित्य ठाकरे त्यांना रोज गद्दार म्हणून डिवचत आहेत. तर दुसरीकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांना गद्दार, विश्वासघातकी म्हणून डिवचत आहेत, अशातच शिंदे गटासोबत गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना काही खोचक सवाल केले आहेत. तसेच शरद पवार यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सर्व करायला लागला त्यामुळेच असं घडलं. ज्या दिवशी तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीला सोडून परत याल, त्या दिवशी तुम्ही आमचे नेते आपोआप व्हाल असेही रामदास कदम म्हणालेत, तर नवा पक्ष नकोच, मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार आणि भगव्यातच जाणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

आधीच भेटला असता तर ही वेळ आलीच नसती

तर उद्धवजींनी या गोष्टींचा स्वतः अभ्यास केला पाहिजे, तुम्ही अडीच वर्षांमध्ये आमदारांना किती भेटलात. खासदारांना किती भेटला ते पाहिलं पाहिजे. त्यांच्या समस्या पण किती सोडवल्या आणि त्यांना का जावं लागलं आणि ते गेले नसते तर त्यातला एक ही आमदार पुन्हा निवडून आला असता का? या सर्व गोष्टींचा उद्धव ठाकरेंनी अभ्यास करून पहावा. ज्या काळात तुम्हाला भेटता येत नव्हतं त्या काळात तुमचा मुलगा लोकांना भेटू शकला असता. त्यांना काय अडचण होती? असा सवाल त्यांनी केला आहे. आज तुम्ही मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले. आता तुम्ही सर्वांना भेटत आहात, अशाच पद्धतीने जर तुम्ही मागच्या अडीच वर्षात भेटला असता तर आज ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले आहेत.

शिवसेना संपवण्याचा डाव

तसेच अजित पवार आमच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदाराला सर्व ताकद देऊन शिवसेनेच्या विद्यमान आमदाराला संपवतोय हे सातत्याने अडीच वर्षात जाणवलं, अनिल परबांना हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला असा आरोप रामदास कदम यांनी पुन्हा केला आहे. शरद पवार पुरस्कृत आपले विचार आहेत, आज आपण राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसला हाच बाळासाहेबांनी तुमच्यातला फरक आहे. या ठिकाणी कोणतीही घराणेशाही येत नाही. तसेच एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले आहेत आणि उद्धव ठाकरे पवारांचे विचार घेऊन काम पाहत आहेत असा घणाघातही त्यांनी केला आहे.

तो नगराध्यक्ष सरकारचा जावयी आहे का?

खेड  नगरपरिषदेचा मनसेचा नगराध्यक्ष होता. तो राष्ट्रवादीचं उघडपणे काम करतोय. त्याची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली. त्यानंतर कायद्याने लवकरात लवकर निर्णय व्हायला हवा होता. तो तिथे शिवसेनेच्या मुळावर उठल्याचेही सांगितलं. पण सरकारने त्याच्यावरती कारवाई केली नाही. तो सरकारचा जावई आहे का? असा सवाल ही रामदास कदम यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी वर्षा निवासस्थान सोडलं त्या दिवशी माझ्याही डोळ्यातून पाणी आलं. मलाही वाईट वाटलं त्याबद्दल कुठेही दुमत नाही. पण तुम्ही शरद पवारांचे मुख्यमंत्री म्हणून खाली उतरला की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला. शिवसेनेच्या आणि भगव्या विचारधारा असताना तुम्ही शरद पवारांचं ऐकूण मनसेच्या नगरसेवकाला अभय देताय, म्हणजे आम्ही नेमकं समजायचं काय? असा सवाली त्यांनी केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.