अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?; रामदास कदम भडकले
रामदास कदम यांचा खोतकरांना सवाल
मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर ईडीचं पथक पोहोचलं आहे. अश्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. त्यांनी अर्जुन खोतकरांना (Arjun khotkar) सवाल विचारला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?”, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. इच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. त्याबाबत विचारलं आसता सर्वात आधी खोतकरांनी मला फोन केला होता, पण मला असं काही बोलेल नाहीत. @##%% हा एवढा घाबरट कधीपासून झाला हा, म्हणजे त्याने खाल्लेत का पैसे? अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?, म्हणालेत.
संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी
राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वार्थ साधला आणि आमदारांना वाऱ्यावर सोडले. उध्दव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेतल त्यांनी ही सर्व जुळवाजुळव केल्याने महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे कदमांनी सांगितले आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही आमदारांवर अन्याय
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांनाच होता. जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही. ते शिवसेनेचे नेते असले तरी त्यांनी कायम राष्ट्रवादीचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यानंतर कॉंग्रेसच्या आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना केवळ 17 टक्के निधी या आमदारांना हा कोणता न्याय असा सवाल त्यांनी नेतृत्वाला आणि राऊतांनाही विचारला आहे.