उद्धव ठाकरेंबद्दल बोललो त्याचा पश्चात्ताप नाही, पण माझ्या म्हणण्याचा…; रामदास कदम विधानावर ठाम
पण तरी देखील मी माझे शब्द मागे घेतो, मला मातोश्री म्हणजे काय हे माहित आहे. म्हणून सांगतो, मी रश्मी ठाकरे यांच्याबाबत बोलायला नको होतं, रश्मी ठाकरे यांच्याविषयी मी अनावधानाने बोलून गेलो.
मुंबई : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, टीव्ही 9 वर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, साप साप समजून जमीन झोडपण्यासारखं हे आहे. जे वास्तव तेच मी बोललो, माझ्या बोलण्याचा मतीतार्थ काय होता हे समजून घ्यायला हवं आहे. उद्धव साहेब यांच्याबद्दल मी त्या अर्थाने हे वक्तव्य केलेलं नाही. उद्धव ठाकरेजी हे राष्ट्रवादीसोबत (ncp) आहेत, या भूमिकेला घेऊन मी हे वक्तव्य केलं आहे. पण त्याचे सोयीप्रमाणे अर्थ काढू नयेत ही विनंती.
तसेच सुषमा अंधारे यांना माझं मराठवाड्यातलं काम मला माहित नाही, यापूर्वी मला सुषमा अंधारे माहित नव्हत्या, मला मराठवाड्यात फिरु देणार नाही, या सुषमा अंधारे यांच्या अशा आव्हांनाना किंवा बोलण्याला मी भिक घालत नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे हे नेहमी म्हणतात, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे हे विसरु नका, मग तुम्हाला शंका आहे का, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी केली होती, या टीकेवर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
यावर रामदास कदम स्पष्टीकरण देताना म्हणतात, माझ्या बोलण्याचा तसा वाईट अर्थ काढू नका, मला हेच म्हणायचं होतं, बाळासाहेब ठाकरेंसारखं तुम्ही का करत नाहीत, त्या विचारधारेसोबत का जात नाहीत, असं मला म्हणयाचं होतं, पण माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे.
पण तरी देखील मी माझे शब्द मागे घेतो, मला मातोश्री म्हणजे काय हे माहित आहे. म्हणून सांगतो, मी रश्मी ठाकरे यांच्याबाबत बोलायला नको होतं, रश्मी ठाकरे यांच्याविषयी मी अनावधानाने बोलून गेलो. पण आदित्य ठाकरे नेहमी खोके आणि गद्दार म्हणतात, याचं काय? असा सवालही त्यांनी केला आहे.
सुषमा अंधारे कोण आहेत, हे मला माहित नाही. पण रश्मी ठाकरे यांच्याविषयी मी जे अनावधानाने बोललो, ते शब्द मी मागे घेतो, पण दिलगिरी व्यक्त करणार नाही.