…तर त्यांनी ‘हे’ देखील जनतेला सांगावे; रामदास कदमांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरूच आहे. रामदास कदम यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

...तर त्यांनी 'हे' देखील जनतेला सांगावे; रामदास कदमांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 7:52 AM

मुंबई : शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरूच आहे. शिवसेनेकडून खोके सरकार आणि गद्दार म्हणत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील शिवसेनेच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते रामदास कदम  (Ramdas Kadam) यांनी शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते फक्त खोके आणि गद्दार म्हणतात. पण खोके आणि गद्दार म्हणण्यापलीकडे त्यांनी गेल्या अडीच वर्षात जनतेसाठी काय केलं? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. अडीच वर्षात जनतेसाठी काय कामं केलं हे आदित्य ठाकरेंनी एकदा सांगावे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. ते फक्त खोके आणि गद्दार एवढचं म्हणतात. मात्र गेल्या अडीच वर्षात त्यांनी जनतेसाठी काय केलं? हे एकदा त्यांनी सांगावं असं म्हणत त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

दसरा मेळाव्यावरून निशाणा

दुसरीकडे रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यावरून देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावर बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं आहे की, खरी शिवसेना कोणाची हे दसरा मेळाव्यामध्येच स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

दसरा मळाव्याला होणारी गर्दीच सर्व काही सांगून जाईल. कोर्टात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादासाठी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे. मात्र दसरा मेळाव्यासाठी वाट पाहाण्याची गरज नाही. दसरा मेळाव्याला जमणारी गर्दीच सर्व काही सांगून जाईल असं कदम यांनी म्हटलं आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....