Ramdas Kadam : शरद पवार, अजित पवारांनी डाव साधला, दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा आरोप

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच रामदास कदम यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधला.

Ramdas Kadam : शरद पवार, अजित पवारांनी डाव साधला, दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा आरोप
रामदास कदमImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 11:50 AM

मुंबई : रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अजित पवार  यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. सेना कोसळताना पहावत नाही. आज माझे वय सत्तर वर्ष आहे. गेली 52 वर्ष मी शिवसेनेसाठी काम करत आहे हे सांगताना त्यांना आश्रू अनावर झाले.

‘या वयात आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं’

पुढे बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं आहे की, माझ वय आज सत्तर वर्ष आहे. मी गेली 52 वर्ष शिवसेनेसाठी काम करत आहे. शिवसेना वाढवण्यासाठी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन प्रकरणात माझ्यावर अनेक गुन्हे आहेत. मात्र तरी देखील आदित्य ठाकरे माझ्या कॅबीनमध्ये येऊन मला बैठका घेण्याचे आदेश देतात. या वयात आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावे लागते, याची खंत वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. मात्र मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणल्याशिवाय शांत बसणार नाही, अखेरपर्यंत माझ्या हातात भगवाच असेल असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही’

शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. आम्ही सांगत होतो मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकले नाही. पवारांनी बरोबर डाव साधून शिवसेना फोडली असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच शिवसेनेतून आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान दुसरीकडे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आमदारानंतर आता खासदारांनी देखील बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.  या खासदारांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.