Politics: रामदास कदमांची जहरी टीका, पुत्र योगेश कदमाला मात्र शिवसेनेच्या ‘त्या’ गोष्टीची आजही जाणीव
योगेश कदम हे शिवसेनेला केंद्रस्थानी मानून मतदार संघात काम करीत होते. पण याच मतदारसंघात अनिल परब यांनी सातत्याने ढवळाढवळ केली.
रत्नागिरी : (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेनंतर (Ramdas Kadam) रामदास कदम यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात नेमके काय बोलले जाणार याकडे जिल्हा भरातील नागरिकांचे लक्ष होते. या मेळाव्यात (Yogesh Kadam) योगेश कदम यांनी शिवसेनेसाठी किती योगदान दिले आणि पदरी काय पडले याचा उहापोह केला. तर मातोश्री बद्दल कायम आदर हा मनात राहणार. शिवाय मातोश्रीमुळेच आपण आमदार झाल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार कायम राहतील असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेतील इतर नेत्यांवर टीकास्त्र सोडले. तर दापोलीत शिवसेनेचे खच्चीकरण राष्ट्रवादी वाढवण्याचा डाव हा शिवसेनेतील काही नेत्यांचा होता असे म्हणत त्यांनी अनिल परबांवरही टीका केली.
पक्ष वाढीसाठी केवळ रामदास कदम यांनीच नाहीतर आपणही जीवाचे रान केले होते. कारण आपला जीव हा भगव्यामध्येच होता. पण याच दापोली मतदार संघात काहींनी राष्ट्रवादीला हाताशी धरून तो पक्ष वाढवण्याचे प्रयत्न केल्याचे म्हणत योगेश कदम यांनी अनिल परब यांना टार्गेट केले.
मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही निधी वाटपास मात्र अजित पवार, यामुळे मतदार संघावर कायम अन्याय झाला होता. अशा परस्थितीमध्येही केवळ पक्ष वाढीसाठीचेच प्रयत्न केले तर अजित पवार यांनी कुणबी समाजाचे कसे विभाजन होईल यावरच लक्ष दिले. यासंदर्भात पक्ष प्रमुखांच्या कानी घालूनही योग्य वेळी योग्य निर्णय झाला नाही, त्याचेच हे फलीत असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले आहे.
50 खोके एकदम ओक्के, गद्दार हे म्हणणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलला काम करताना काय अवस्था होते याची जाणीव आता त्यांना होत असल्याचे म्हणत योगेश यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मैत्रिमध्ये गळाभेट भेट आहे पण गद्दारी करुन पाठीत खंजीर खूपसणे हेच त्यांना आता महागात पडत असल्याचेही ते म्हटले आहेत.
योगेश कदम हे शिवसेनेला केंद्रस्थानी मानून मतदार संघात काम करीत होते. पण याच मतदारसंघात अनिल परब यांनी सातत्याने ढवळाढवळ केली. ती पक्षाच्या हितासाठी नाहीतर राष्ट्रवादीसाठी. सर्वकाही लक्षात येऊन देखील याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
गुहागर मतदार संघात आगामी काळात पुढे कोणीही असू द्या, त्याचा पराभव ठरलेला आहे. या मतदार संघातील जनतेला माहित आहे त्यांच्या हितासाठी आणि शिवसेना पक्षासाठी कोणी जीवाचे रान केले ते. त्यामुळे आजच हे आव्हान स्विकारा असे योगेश कदम यांनी शिवसेनेला सुनावले आहे.