LIVE रामटेक लोकसभा मतदारसंघ
नागपूर: नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे पुन्हा एकदा युतीकडून रामटेकमधून लढत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ताकदवान नसल्याने शिवसेनेला रामटेकची जागा सोपी जात होती. मात्र, यंदा काँग्रेसकडून किशोर गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे-पाटणकर रिंगणात असल्याने रामटेकमध्ये यंदा कोण बाजी मारतंय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कृपाल तुमाणे – […]
नागपूर: नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे पुन्हा एकदा युतीकडून रामटेकमधून लढत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ताकदवान नसल्याने शिवसेनेला रामटेकची जागा सोपी जात होती. मात्र, यंदा काँग्रेसकडून किशोर गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे-पाटणकर रिंगणात असल्याने रामटेकमध्ये यंदा कोण बाजी मारतंय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
- कृपाल तुमाणे – शिवसेना
- किशोर गजभिये – काँग्रेस
- किरण रोडगे-पाटणकर – वंचित बहुजन आघाडी
LIVE UPDATE
- रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे यांनी नागपुरातील इंदिरा गांधी शाळेत मतदान केलं.
- निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे स्थिर सरकारसाठी मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावे, उन असलं तरी उन्हाची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावा, असं आवाहन तुमानेणे यांनी केलं.
रामटेकमध्ये 16 उमेदवार रिंगणात आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात जवळपास 9 लाख मतदार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात जवळपास 2436 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. रामटेकमध्ये जवळपास 1400 पोलीस शिपायांसह कर्मचारी तैनात आहेत.
सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.