ज्यांच्या प्रश्नावरुन शरद पवार संतापले, ते पद्मसिंह पाटील आज राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा करणार?
पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjitsinh Patil) हे आज राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशबाबतची घोषणा करण्याची चिन्हं आहेत.
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ज्यांच्या प्रश्नावरुन संतापले, ते डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) आज राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. नातेवाईक (Padmasinh Patil) पक्ष का सोडत आहेत, असा प्रश्न विचारताच पवारांना संताप अनावर झाला आणि त्यांनी पत्रकार परिषद सोडण्याचा पवित्रा घेतला.
पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjitsinh Patil) हे आज राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशबाबतची घोषणा करण्याची चिन्हं आहेत.
एकेकाळी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शरद पवारांचे कौतुक करताना पवार सर्वस्व असल्याची आणि कायम पाठीशी राहणार असल्याचे म्हटले होते. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात पवनराजे हत्याकांडावरुन मुसमुसलेला हत्ती अशी टीका केली होती. मात्र आता युतीत उद्धव ठाकरे हे डॉ पाटील यांच्यासाठी मते मागणार का हे महत्वाचे आहे.
कुठे काही आडले नडले तर आम्ही पवार साहेबांकडे धाव घेतो, ते आम्हाला मदत करतात. सतत मी पवार साहेबांच्या पाठीशी राहिलो ते माझे सर्वेसर्वा आहेत आणि मी कायम त्यांच्या पाठीशी राहणार असे डॉ पाटील म्हणाले होते . पवार साहेबांना उस्मानाबादबाबत कायम आस्था असून त्यांचे काम कधीही विसरणार नाही, असं पद्मसिंह पाटील म्हणत असत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ पाटील यांना पवनराजे हत्याकांडानंतर धारेवर धरलं होतं. जाहीर सभेत कडाडून टीका केली होती. पद्मसिंह पाटील यांच्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादी अडचणीत आली होती.
जे आमदार राणा जगजीतसिंह पाटील भाजपात जाण्याची शक्यता आहे त्यांनी भाजप आणि शिवसेना सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका करत, धिक्कार मोर्चा काढला होता. भाजपचा धिक्कार करणारे आमदार पाटील आता भाजपचा जयघोष करणार आहेत.
संबंधित बातम्या
नातेवाईक सोडून का चालले? प्रश्न विचारताच शरद पवार संतापले, माफीची मागणी