Rana vs Thackeray : ‘भीमरुपी महारुद्रा…’ हनुमान चालिसेला मारुतीस्तोत्रानं शिवेसनेचं प्रत्युत्तर! राणांच्या घराबाहेर ‘बोल बजरंग बली की जय’

महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून राजकारण तापल्याचं आपण पाहतोय. नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली आहे. यानंतर राणांच्या इमारतीखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक उभे आहेत.

Rana vs Thackeray : 'भीमरुपी महारुद्रा...' हनुमान चालिसेला मारुतीस्तोत्रानं शिवेसनेचं प्रत्युत्तर! राणांच्या घराबाहेर 'बोल बजरंग बली की जय'
आक्रमक झालेले शिवसैनिक शांत झाले आहेतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 9:59 AM

मुंबई – महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून राजकारण तापल्याचं आपण पाहतोय. नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली आहे. यानंतर राणांच्या इमारतीखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक उभे आहेत. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेरील अडथळे तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. अमरावतीचा कचरा साफ करण्यासाठी आलो असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. तसेच राणांच्या घराबाहेर ‘बोल बजरंग बली की जय’अशा घोषणा देण्यात आल्या. राणा दाम्पत्याच्या इमारतीच्या गेटवर मारुतीस्तोत्रच सामुहीक वाचन केलं आहे. सध्या आक्रमक झालेले शिवसैनिक शांत झाले आहेत. परंतु इमारतीच्या बाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढत आहे.

राणा दाम्पत्याच्या विरोधात सातत्याने घोषणाबाजी

नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या संख्येने शिवसैनिक ‘मातोश्री’बाहेर उभे आहेत. दरम्यान, रात्री उशिरा तिथून जात असलेले भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवरही संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. आज रवी आणि नवनीत राणा येथे आल्यास चकमक होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. या संघर्षाची परिस्थिती पाहता मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवनीत आणि रवी राणा सध्या त्यांच्या खारच्या घरी उपस्थित असून त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत. त्यांनी राणा दाम्पत्याच्या विरोधात सातत्याने घोषणाबाजी केली आहे. तेही घरातून बाहेर पडले तर आम्ही त्यांना आमच्या शैलीत समजावून सांगू, असे शिवसैनिक सांगतात. नवनीत राणा आणि रवी राणा यांनाही मुंबई पोलिसांनी कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे.

हिंदुत्वाची आठवण करून द्यायची आहे

राणा दाम्पत्याने शनिवारी, 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाची आठवण करून द्यायची आहे. स्वत : उद्धव ठाकरेही आम्हाला मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखू शकत नाहीत असंही त्यांनी मीडियाला सांगितले आहे.

Rana vs Thackeray : शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले! ‘आम्ही त्यांना सोडणार नाय’ शिवसैनिक आक्रमक

Buldana Road Accident : साखरपुड्यासाठी जात असताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स-अल्टोची जोरदार धडक, 3 ठार

धक्कादायक! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.