मोहिते-पाटील तयार राहा, मुख्यमंत्र्यांचे आदेश, माढ्यातून उमेदवारी निश्चित?
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. विजयसिंह मोहिते- पाटील पिता पुत्रापैकी एकाला भाजपची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना सर्व कागदपत्रांची […]
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. विजयसिंह मोहिते- पाटील पिता पुत्रापैकी एकाला भाजपची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या दोघांपैकीच एकाला उमेदवारी मिळण्याचं जवळपास निश्चित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र भाजपने अद्याप त्यांची उमेदवारी होल्डवर ठेवली आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे अजूनही राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेऊन तिकीट देणार की त्याऐवजी रणजितसिंहांना उमेदवारी मिळते याबाबतचा फैसला आज होण्याची चिन्हं आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्पायत 23 एप्रिलला मतदान होणार आहे. महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असताना अद्याप भाजपने उमेदवारच जाहीर केलेला नाही.
राष्ट्रवादीकडून संजय शिंदे रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे. 5 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबादची उमेदवारी जाहीर केली.
कोण आहेत संजय शिंदे?
संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे.
संजय शिंदे हे मोहिते पाटील कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असून, अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच, संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू असून, माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.
वाचा – उस्मानाबादेत शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, युवासेनेचे नेते ओमराजेंना उमेदवारी
संबंधित बातम्या
संजय शिंदे आपलाच माणूस, घरच्या माणसाचा कधी पक्षप्रवेश असतो का? शरद पवार
राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद आणि माढ्याचा उमेदवार अखेर जाहीर
काँग्रेसला आणखी एक धक्का, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा भाजपात प्रवेश
माढ्यात फक्त उमेदवारांची नव्हे, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला
युती, आघाडी आणि बहुजन वंचित आघाडी, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी?
तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं : जानकर