‘आदित्यजी, जरा आपल्या वयाला शोभेल असं बोला!’ रावसाहेब दानवेंचा सल्ला
रावसाहेब दानवे यांनी आदित्य ठाकरे यांना एक सल्ला दिलाय. वाचा...
जालना : शिंदेगटाच्या बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा आक्रमकपणा पाहता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी आदित्य ठाकरे यांना एक सल्ला दिलाय. ‘आदित्य ठाकरेजी, जरा आपल्या वयाला शोभेल असं बोला!’, असं दानवे म्हणालेत.
आदित्य ठाकरे यांनी वयाप्रमाणे बोललं पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडवणीस यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही.त्यांचं बोलणं हे पातळी सोडून आहे, असं रावसाहेब दानवे म्हणालेत.
शिवसेनेच्या ठाकरेगटावरही त्यांनी भाष्य केलंय. भारतीय जनता पक्ष कोणत्याही राजकीय पक्ष फोडणार नाही. जरी शिवसेनेला धोका दिला असला तरी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले.आम्ही शिवसेनेला पाडले नाही. परंतु त्यांच्या अंतर्गत वादामुळे ते पडले, असं दावने म्हणाले.
शिंदेगटातील आमदार फोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा भाजप शिंदे गटाचा एकही आमदार फोडणार नाही, कारण आम्ही एकत्र आहोत. आमची युती आहे, असं दानवे म्हणालेत.
गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील तसंच राणा आणि बच्चू कडु यांच्यामध्ये जो वाद होत आहे, त्या संदर्भात मी त्यांना फोन करेल आणि माहिती घेऊन सांगेल,असंही ते म्हणालेत.
अर्जुन खोतकर आणि माझ्यामधील कटुता संपली आहे. मीडियाने आमच्या आता भांडणं लावू नयेत, असं थेट बोलायलाही दानवे विसरले नाहीत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परिस्थितीचा अंदाज घेऊन केंद्राला कळवलं जाईल आणि शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असा शब्दही दानवे यांनी दिलाय.