मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ, अशी भीती वाटते : दानवे

एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्ष लागायची. त्यानंतर तो तीस वर्ष पक्षाचं काम करायचा, मात्र आता परिस्थिती बदलली असून पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही, असं रावसाहेब दानवे पुण्यातील विजय संकल्प मेळाव्यात म्हणाले.

मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ, अशी भीती वाटते : दानवे
Follow us
| Updated on: Sep 26, 2019 | 3:46 PM

पुणे : भाजपमध्ये होत असलेल्या मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटत आहे, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve on BJP Megabharati) यांनी केलं आहे. पुण्यातील वडगाव मावळमध्ये विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना दानवेंनी मेगाभरतीवर मिष्किल शब्दांत टिपण्णी केली.

पक्षात माणसं कमी नाहीत उलट दुसऱ्या पक्षातील नेते इकडे येत असताना आम्ही जीव मुठीत धरुन बसलो होतो. मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटत आहे, असं रावसाहेब दानवे म्हणताच एकच हशा पिकला.

एक काळ असा होता, ज्यावेळी एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्षे लागायची. त्यानंतर तो तीस वर्ष पक्षाचं काम करायचा, मात्र आता परिस्थिती बदलली असून काही मतदारसंघांत पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही, असंही ते म्हणाले.

Viral वास्तव : अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं प्रचारगीत?

पक्ष बदलून जे कार्यकर्ते आपल्यात आले (Raosaheb Danve on BJP Megabharati) ते सहज आलेले नाहीत, विचार करुन आलेले आहेत. भाजपमध्ये जमेल का? तिथे आपल्याला सांभाळून घेतले जाईल का? अशा प्रश्नांमुळे त्यांना रात्रभर झोप येत नव्हती. पण त्यांनी हिंमत केली आणि भाजपमध्ये आले. जुन्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना बैलासारखी शिंग मारु नयेत, त्यांना सांभाळून घ्यावं, असं आवाहन दानवे यांनी केलं.

अजित पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बँक बरखास्त केली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून बँक घोटाळा केल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सहकारी बँक बरखास्त केली, तेव्हा अजित पवार बँकेचे संचालक होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच संगनमताने ही बँक बरखास्त केली. या बँकेच्यामार्फत तुम्ही 13 कारखान्यांना एक हजार कोटींपेक्षा अधिक कर्जांचे वाटप केले. ते कारखानेही दिवाळखोरीत निघाले आणि त्यानंतर या कारखान्यांना ज्यांनी दिवाळखोरीत काढले त्यांनीच ते विकत घेतले. तसेच या बँकांना पुन्हा कर्ज का देण्यात आलं?, असा सवालही दानवेंनी यावेळी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.