ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो; स्वच्छ असल्यास घाबरायचे कारण नाही: रावसाहेब दानवे

| Updated on: Nov 24, 2020 | 2:38 PM

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. (raosaheb danve on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik)

ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो; स्वच्छ असल्यास घाबरायचे कारण नाही: रावसाहेब दानवे
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो. आपण स्वच्छ असल्यास घाबरायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. (raosaheb danve on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik)

आपण स्वच्छ आल्यास ईडीला घाबरायचे कारण नाही. प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनी ईडीला घाबरायचे कारण नाही. छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. माझ्याही घरावर छापा पडला तर मी स्वच्छ असेल तर घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. सरनाईक यांच्या घरावर मारण्यात आलेला छापा हे केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर दानवे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

सरकार येणार याचं नियोजन कसं सांगू?

येत्या दोन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा दानवे यांनी काल केला होता. त्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कसं सांगू?, असंही ते म्हणाले.

सरनाईक यांच्या घरावरील छापेमारीचा घटनाक्रम

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आज सकाळी 8 वाजता ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे मारले. सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि दहा ठिकाणांवर हे छापे मारण्यात आले. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं.

ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली. ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे. ही धाड मारण्यापूर्वी ईडीने पूर्ण तयारी केली होती. ईडीने पोलिसांसह स्थानिक प्रशासनालाही या धाडीचा सुगावा लागू दिला नाही. (raosaheb danve on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik)

 

संबंधित बातम्या:

‘सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये!’, ईडी कारवाईवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांकडे सूचक इशारा

MLA Pratap Sarnaik ED Raid | विहंग आणि पूर्वेशची ईडीकडून समोरासमोर बसून चौकशी होणार?

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन

(raosaheb danve on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik)