Raosaheb Danve : उद्धव ठाकरे-शहा यांच्या बंददाराआडील ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं?; रावसाहेब दानवेंनी सांगितली इन्साईड स्टोरी

Raosaheb Danve : आधी बाहेर सर्वांची चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे अमित शहांना म्हणाले, आपण दोघे आत बसू. ते आत होते आणि आम्ही बाहेर होतो. बाहेर आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, चला पत्रकार परिषद घेऊ. आत काय झालं याचा त्यांनी विषयच काढला नाही.

Raosaheb Danve : उद्धव ठाकरे-शहा यांच्या बंददाराआडील 'त्या' चर्चेत नेमकं काय ठरलं होतं?; रावसाहेब दानवेंनी सांगितली इन्साईड स्टोरी
उद्धव ठाकरे-शहा यांच्या बंददाराआडील 'त्या' चर्चेत नेमकं काय ठरलं होतं?; रावसाहेब दानवेंनी सांगितली इन्साईड स्टोरीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 10:39 AM

नवी दिल्ली: भाजपचे नेते अमित शहा (amit shah) यांनी मातोश्रीवरील बंददाराआडील चर्चेत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, भाजपने तो पाळला नाही. त्यामुळेच आम्ही युतीतून बाहेर पडलो, असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात आहे. तर बंददाराआडील चर्चेत असं काहीच ठरलं नव्हतं, असं भाजपकडून (bjp) सातत्याने सांगितलं जात आहे. त्यामुळे बंददाराआडील चर्चेत नेमकं घडलं काय? असा सवाल या निमित्ताने केला जात असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. या बंददाराआडील चर्चेची इन्साईड स्टोरीच दानवे यांनी सांगितली. बंददाराआडील चर्चेत मुख्यमंत्रीपदाचा विषय निघाला होता. पण बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी जो मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरवला होता, तोच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

भाजपने शब्द पाळला नाही असं वारंवार सांगितलं जातं. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली तेव्हा मी भाजपचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. तेव्हा अमित शहांचा मला फोन आला. आपल्याला शिवसेनेशी युती करायची आहे. तेव्हा आमची एक टीम तयार झाली. त्यात देवेंद्र फडणवीस, मी, चंद्रकांत पाटील आणि आमचे काही नेते होते. शहा मुंबईत आले. तेव्हा सेनेसोबत चर्चा करायची तर काय बोलायचं याचे मुद्दे काढण्यात आले. ते मुद्दे घेऊन आम्ही संध्याकाळी मातोश्रीवर गेलो. त्यांचेही काही नेते होते, असं दानवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्यात मोडतोड नकोच

आधी बाहेर सर्वांची चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे अमित शहांना म्हणाले, आपण दोघे आत बसू. ते आत होते आणि आम्ही बाहेर होतो. बाहेर आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, चला पत्रकार परिषद घेऊ. आत काय झालं याचा त्यांनी विषयच काढला नाही. फक्त प्रेसमध्ये काय बोलायचं तेच ठरलं. प्रेसमध्ये भाजप किती जागा लढेल आणि शिवसेना किती जागा लढेल एवढंच सांगितलं. पण त्या दोघात आत जाऊन जी चर्चा झाली, ती उद्धव ठाकरेंनी सांगितली नाही. पण सह्याद्री गेस्ट हाऊसला गेल्यावर शहांनी आम्हाला ते विषय सांगितले. शहा म्हणाले, जागा वाटपाचा विषय होता. विधानसभेचा विषय होता. मुख्यमंत्रीपदाचा विषय उद्धव ठाकरेंनी काढला होता. पण मी सांगितलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती झाली आहे. प्रमोद महाजन-बाळासाहेब ठाकरेंनी युती केली आहे. युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यांचे जास्त आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल. त्यात आपण काहीच मोडतोड करायची नाही. हे त्या दिवशी ठरलं होतं, असं दानवे म्हणाले.

केव्हा तरी हा स्फोट होणार होता

गेल्या 15 दिवसातील शिवसेनेच्या घडामोडी पाहिल्या आणि विधानसभेतील आमदारांचं भाषण पाहिलं तर त्यांचं एका गोष्टीवर एकवाक्यता आहे. ती म्हणजे आम्ही बंड केलं नाही, आम्ही उठाव केला. आम्हीच मूळ शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही फुटलो आम्ही बंडखोरी केली हे चुकीचं आहे. ज्या बाळसााहेबांनी युती घडवली. ती विचारावर आधारीत युती होती. सेना आणि भाजपचे एक विचार आहे. ती 25 वर्ष राहिली. या युतीत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढलो. लोकांनी युतीला कौल दिला. मात्र, सेनेने दगाफटका केला. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेसाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली. ही आघाडी राज्यातील जनतेला पसंत नव्हती. आमदारांना पसंत नव्हती. खासदारांनाही पसंत नव्हती. केव्हा तरी हा स्फोट होणार होता. पहिल्या दिवसापासून हे सांगत होते की, भाजप हे सरकार पाडणार आहे. आम्हीही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, भाजप कधीच सरकार पाडणार नाही. पण यांच्यात काही झालं तर यांच्या गुणाने सरकार पडलं तर ते आपोआप पडेल, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही मुख्यमंत्री झालो का?

शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदेंकडे आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. संख्या कुणाकडे आहे आज? 18 पैकी 12 खासदार शिंदेंकडे आहेत. 55 पैकी 40 आमदार शिंदेकडे आहेत. मग शिवसेना कुणाची आणि शिवसेना प्रमुख कोण आहेत आता? त्यांनी शिवसेना प्रमुखपदावर दावा सांगितला नाही. पण ते नेता म्हणून तेच आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं काही असू द्या. भाजपचा यांच्या फुटीशी काही संबंध नाही. हे फुटले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला असं काही झालं नाही. हे फुटले आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आम्हीच शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. भाजपने काय केलं? आम्ही मुख्यमंत्री झालो का?, असा सवाल त्यांनी केला.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.