आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?

आता भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केले. रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवबद्दल भाष्य केले.

आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 3:13 PM

Raosaheb Danve on Jalna loksabha constituency : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच नेते, पदाधिकारी मतदारसंघांची चाचपणी करत आहे. तसेच महायुती आणि महाविकासआघाडीत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच आता भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केले. रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवबद्दल भाष्य केले.

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रावसाहेब दानवे हे सलग पाच वेळा निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध कॉग्रेसचे डॉ.कल्याण काळे हे मैदानात उतरले. या मतदारसंघावर दानवेंची मजबूत पकड समजली जात होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना अटीतटीची लढत दिली होती. त्या निवडणुकीत दानवे यांनी काळे यांचा 8 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. आता यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

रावसाहेब दानवे यांचा एक लाख मतांच्या फरकाने पराभव झाला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव जालन्याच्या निवडणुकीवर दिसून आला. यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. माझ्या मुलाच्या मतदारसंघातदेखील मला कमी लीड मिळाले, मग मी आता त्याचाही बदला घेऊ का, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी विचारला.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

“माझा पराभव हा एखाद्या व्यक्तीमुळे झालेला नाही. माझ्या मुलाच्या मतदारसंघातही मला लीड मिळाली नाही. मग त्यात माझ्या मुलाने काम केलं नाही असं मी म्हणू का? किंवा मी आता त्याचाही बदला घेऊ का?” असे रावसाहेब दानवे म्हणाले. “माझा पराभव जनमतामुळे झाला आहे. त्यामुळे यात कोणालाही दोष देता येणार नाही”, असे रावसाहेब दानवेंनी म्हटले. “राज्याच्या राजकीय वातावरणात अचानक बदल झाला आणि त्याचा फटका पक्षाला बसला”, असे दानवे म्हणाले.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.