‘या’ आमदाराला रश्मी शुक्लांनी धमकावलं, जितेंद्र आव्हाडांनी आमदाराचं नावही सांगितलं!

रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. | Rashmi Shukla jitendra Awhad

'या' आमदाराला रश्मी शुक्लांनी धमकावलं, जितेंद्र आव्हाडांनी आमदाराचं नावही सांगितलं!
रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती.
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 2:14 PM

मुंबई: सध्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे केंद्रस्थानी असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावले होते, असे आव्हाड यांनी म्हटले. (Jitendra Awahad slams IPS officer Rashmi Shukla)

जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ट्विट करुन हा आरोप केला. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता रश्मी शुक्ला आणि भाजपकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागाचे राज्यमंत्रिपद राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत. महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

त्यावेळी रश्मी शुक्ला रडल्या होत्या: आव्हाड

रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या. त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेल्या तेथेही त्या रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करु नये, अशी विनंती केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार दिलदार आहे. त्यामुळे मन मोठं करुन आघाडी सरकारने तेव्हा रश्मी शुक्ला यांना माफ केलं. मात्र, त्यावेळी याच रश्मी शुक्ला समोर उभ्या राहून नवं बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नव्हतं, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

संजय राऊतांचा इशारा खरा ठरणार; फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार?

(Jitendra Awahad slams IPS officer Rashmi Shukla)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.