Rashmi Thackeray : ‘मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज’, अब्दुल सत्तार यांचा पुनरुच्चार; चर्चेला उधाण

'सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेलतर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे', असा दावा शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलाय.

Rashmi Thackeray : 'मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज', अब्दुल सत्तार यांचा पुनरुच्चार; चर्चेला उधाण
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 8:27 PM

औरंगाबाद : ‘सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे’, असा दावा शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलाय. अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीही रश्मी ठाकरे आणि मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. हिवाळी अधिवेशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पाठीच्या मणक्याच्या त्रासामुळे मंत्रालयात किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नव्हते. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात नवी चर्चा रंगली आहे.

सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असेल तर असेल तर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्यासाठी 25 वर्षापासून राज्यात पूजा झाली आहे. 25 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राहावे अशी विनंती सर्वांनी केली. सुप्रियाताई मुख्यमंत्री झाल्यास कधी होतील, कोणत्या परिस्थितीत होतील हे आज मी काही बोलणार नाही. सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री पदासाठीपुढील 25 वर्षानंतर नंबर लागावा ही ईश्वर, अल्लाहकडे प्रार्थना, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

जानेवारीतही सत्तारांचं वक्तव्य आणि राजकारण जोरात

उद्धव ठाकरे आजारी असताना अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. ‘रश्मी ताईची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून त्यांचं जे नियोजन असते. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात. आदित्य साहेब कसे काम करतात, मोठे साहेब कसं काम करतात, या सर्वांच्या पेक्षा एक महिला म्हणून त्यांचं नियोजन कसं असतं, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचं बळकटीकरण कसं व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मुल न करता, त्यांना सक्षम कसं करायला पाहिजे यासाठी ताईसाहेबांचं काम मोठं आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल तर मला वाटतं काहीही होऊ शकतं. मला वाटतं त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात. आता त्या सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही उत्तम काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे. राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे, असं मत सत्तार यांनी मांडलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचा दुसरा उमेदवार सहज विजयी होईल – सत्तार

राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. सर्व निवडणुकीत घोडेबाजार होऊ शकतो. सर्वांनी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करून पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार सहज विजयी होईल. भाजप जो खेळ खेळला हा राजकारणाचा भाग आहे. विरोधी पक्ष असल्याने ते करत आहेत. आमचे उमेदवार विजयी होतील यात तिळमात्र शका नाही, असा दावाही सत्तार यांनी यावेळी केलाय.

‘महाविकास आघाडी सरकार पाडणे सोपे नाही’

रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, काँग्रेस पाठिंबा मागे घेईल यासाठी रामदास आठवले गणपती पाण्यात बुडवून वाट पाहू लागले आहेत. महाविकास आघाडी सरकारला पाडणे सोपे नाही. तिन्ही घटक पक्ष कुणीही फुटणार नाहीत. त्यांच्या मनाच्या समाधानासाठी हे बोलतात, बोलण्याचे समाधान यांचा पुरते आहे. जोपर्यंत महाविकास आघाडी सरकारचे सुप्रीमो बोलत नाहीत तोपर्यंत पुढे धोका नाही हे आठवले यांचे वक्तव्य राजकारणा पलीकडील आहे.

‘भाजपचा आणि आमचा तलाक’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुरस्कार देण्यास आम्हाला विचारायची गरज नाही, पंतप्रधान आणि अमित शहा जर आमची शिफारस ऐकत असतील मी काहीतरी बोललो असतो शिफारशी बद्दल, भाजपचा आणि आमचा तलाक आहे, असंही सत्तार यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.