“मी विरोधीपक्ष नेत्याला हरवलंय, या भास्कर जाधवला पराभूत करणं इतकं सोपं नाही”
आमदार भास्कर जाधव यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणालेत? वाचा...
रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर टीका केली आहे. रामदास कदम यांनी म्हटलं की भास्कर जाधवांचा पराभव होईल. पण रामदास कदमांनी माझा इतिहास पाहावा. मी भल्याभल्यांना हरवलंय. राज्याचा विरोधी पक्षनेता पराभूत करण्याचा इतिहास या भास्कर जाधवनेच केलाय. या भास्कर जाधवला पराभूत करणं इतकं सोपं नाही, असं भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणालेत.