भाजप पाठोपाठ शिवसेनेचा राष्ट्रवादीलाही दणका, रत्नागिरीच्या शहराध्यक्षाने बांधलं हाती शिवबंधन

रत्नागिरीमधील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सतीश चिकणे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

भाजप पाठोपाठ शिवसेनेचा राष्ट्रवादीलाही दणका, रत्नागिरीच्या शहराध्यक्षाने बांधलं हाती शिवबंधन
satish chikane
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 12:18 AM

रत्नागिरी : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. असे असले तरी या तिन्ही पक्षातील नेते तसेच कार्यकर्ते पक्षबदल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. सध्या रत्नागिरीमधील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सतीश चिकणे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. खेड नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर आली आहे. असे असताना राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे माणले जात आहे. (ratnagiri NCP city president left rashtrawadi and joined Shiv Sena)

रत्नागिरीच्या शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीला रामराम

राज्यात स्थानिक स्वराज संस्थांसोबतच प्रमुख शहरांच्या महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या अनुषंगाने वरिष्ठ नेते पक्षबांधणीवर जोर देत आहेत. नव्या नियुक्त्यांसोबतच दुसऱ्या पक्षातून इनकमिंग अशा सगळ्याच बाजूने पक्षनेत्यांचा विचार सुरु आहे. राज्यामध्ये सध्या शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस हे तिन्ही पक्ष सोबत आले आहेत. तिन्ही पक्ष राज्याचा गाडा हाकत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते पक्षबदल करताना दिसत आहेत. सध्या रत्नागिरीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठाना सोपवला. तसेच शिवसेना आमदार रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेच्या तोंडावर आलेल्या आहेत. असे असताना शिवसेनेने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

संजय राऊतांच्या अपस्थितीत भाजप कार्यकर्ते शिवसेनेत

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुण्याच्या दौऱ्यावर असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राऊत यांना तलावार भेट देण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

देवगड नगरात नारायण राणेंना धक्का

तर दुसरीकडे शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायम राणे यांनाही मोठा धक्का दिल्ला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे.

इतर बातम्या :

‘दिल्लीला महाराष्ट्र कळत नाही, त्यामुळेच ज्ञानपीठ पुरस्कार दाक्षिणात्य साहित्यिकांना दिला जातो’, मधु मंगेश कर्णिक यांची खंत

राज्यात 90 टक्के शाळांत नियमांना डावलून फी वसुली, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात अखेर 8 वर्षांनी आरोपनिश्चिती होणार, कोर्टात नेमकं काय-काय घडलं? वाचा सविस्तर

(ratnagiri NCP city president left rashtrawadi and joined Shiv Sena)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.