भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री!; एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाचा घणाघात

Vinayak Raut on CM Eknath Shinde : दोन दिवसात सर्वोच्च न्यायलायाचा निकाल शिंदेगटाला धडा शिकवणार; 'या' नेत्याचं वक्तव्य

भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री!; एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाचा घणाघात
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 12:43 PM

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री आहेत, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. दोन दिवसात सर्वोच्च न्यायलायाचा निकाल धडा शिकवणार आहे. गिर गई तो भी टांग उपर, अशी शिंदे गटाची अवस्था आहे, असंही ते म्हणालेत.

राज्यातील सत्तासंघर्षावर दोन दिवसात तोडगा निघेल. सर्वोच्च न्यायलयाचा निकाल लवकरच लागले. हा निकाल शिंदेगटाला धडा शिकवणारा असेल, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

कालच्या सामनाच्या अग्रलेखावरून राजकारण तापलं आहे. पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, या शीर्षकाखाली कालचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. विनायक राऊतही त्यावर बोललेत.

संजय राऊत यांचा गाढा अभ्यासक आहे. सामनाच्या अग्रलेखांने महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरवात होते. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष शिवसेनेसाठी महत्वाचे आहेत, असं ही विनायक राऊत म्हणालेत.

वंचित महाविकास आघाडीचा भाग होणार आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर वंचितशी यांच्याशी झालेली चर्चा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे. वंचित संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय होवू शकतो. पक्ष प्रमुखांच्यावर संशय घेवू नये.आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्राधान्य देतोय, असं राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी आम्हाला हवी म्हणजे हवी! देशातील हुकमी राजवट उलथून टाकायची असेल तर सर्वांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार त्यासाठीच मुंबईत येत आहेत, असं राऊतांनी सांगितलं.

कर्नाटकात निवडणूक होतेय. उद्या 10 मेला मतदान पार पडेल. त्यावर ही विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातून भाजपला बोऱ्या बिस्तरा उचलावा लागेल. कन्नडीकांच्या आवाज दाबणारे उद्धव ठाकरे होते. पण आताचे मुख्यमंत्री आता कर्नाटकात भाजपच्या प्रचाराला जात आहेत.

कर्नाटकातील निवडणुकीत मराठी माणसाला मतदान करा हा राज ठाकरे यांचा निर्णय चांगला आहे. भाजप आणि आरएसएसच्या चिठ्ठीवर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून कारभार सुरू आहे, असं राऊत म्हणालेत.

राज ठाकरे यांचं आवाहन

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. सीमाभागातील लोकांना 10 मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे.ही संधी दवडू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याला राऊतांनी पाठिंबा दिलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.