स्वतःच्या पापाचं खापर उद्धवजींवर फोडण्याचं काम सुरू -विनायक राऊत
शिवसेना खासदार विनायक यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
रत्नागिरी : शिवसेना खासदार विनायक (Vinayak Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “रत्नागिरीतील सभा मागच्या सभेचा उच्चांक मोडेल. स्वतःच्या पापाचं खापर उद्धवजींवर फोडण्याचं काम सुरू आहे, असं म्हणत विनायक राऊत यांनी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या विधानाला उत्तर दिलं आहे. कानात साचलेला मळ काढून टाका, असं म्हणत त्यांनी उदय सामंत यांच्यावर रिफायनरी प्रकल्पावरून टीका केली आहे. मागच्या काही महिन्यात जवळपास 9 वेगवेगळ्या प्रकल्प गुजरातला हलविण्यात आले आहेत, असंही राऊत म्हणालेत. आदित्य ठाकरे आज एक दिवसांच्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या उदय सामंत आणि योगेश कदम यांच्या मतदार संघात हा दौरा होणार आहे. आदित्य ठाकरे यांची रत्नागिरी आणि दापोली मतदारसंघात शिवसंवाद यात्रा होणार आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष आहे.