रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार एक सभापतीपद मिळावे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. सभापतीपद न दिल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 22 मार्चला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. (Ratnagiri ZP Election Shivsena Vs NCP)
रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत. सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना नेत्यांना पत्र लिहिलं आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांना पत्र लिहिलं.
भास्कर जाधवांच्या चिरंजीवाचे नाव चर्चेत
आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी चिरंजीव अजून राष्ट्रवादीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भास्कर जाधव यांच्या चिरंजीवाचे नाव रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी चर्चेत आहे. भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीत असलेल्या आपल्या मुलासाठी फिल्डिंग सुरु केली आहे.
काका-पुतण्यामध्ये चुरस
दुसरीकडे, शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांच्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे काका आणि पुतण्यामध्ये पदासाठी चुरस पहायला मिळणार आहे. (Ratnagiri ZP Election Shivsena Vs NCP)
जि.प. अध्यक्षपद निवडणूक 22 मार्चला
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे. सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.
विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद कसं द्यावं?
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांचे नाव चर्चेत आहे. पण विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना कशी संधी देता येईल, यावर सेनेत खलबतं सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न
काका पुतण्यामध्ये चढाओढ, कोण होणार रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष?
भास्कर जाधवांच्या नाराजीचे पडसाद रत्नागिरी झेडपी अध्यक्ष निवडणुकीत?
(Ratnagiri ZP Election Shivsena Vs NCP)