रवी राणांना वादग्रस्त विधान भोवणार? महायुतीतील नेत्यानेच केली मोठी मागणी, म्हणाला “लोकशाहीचा अपमान…”

जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर हे आशीर्वाद दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे वादग्रस्त वक्तव्य बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले होते.

रवी राणांना वादग्रस्त विधान भोवणार? महायुतीतील नेत्यानेच केली मोठी मागणी, म्हणाला लोकशाहीचा अपमान...
रवी राणा
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 3:08 PM

Ravi Rana Controversial Statement : यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर हे आशीर्वाद दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे वादग्रस्त वक्तव्य बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले. रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानतंर आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता महायुतीतील एका नेत्याने रवी राणा यांना घरचा आहेर दिला आहे. “योजनांचं आमिष दाखवून विधानसभेसाठी मत मागणं हा लोकशाहीचा अपमान आहे, अशा लोकांवर गुन्हे दाखल व्हायला हवे”, अशी मागणी महायुतीच्या घटक पक्षातील एका नेत्याने केली आहे.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावतीतील महायुतीच्या समन्वय बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर बच्चू कडू यांना रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले. “लाडकी बहिण योजना आणल्यानंतर राज्यातील जनता नाराज झाली आहे. या योजनेत विधवा महिलांनाही १५०० रुपयेचं लाभ दिला जाणार आहे. तर शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही, आत्महत्येचे प्रमाण वाढलंय”, असे बच्चू कडू म्हणाले.

“रवी राणाचा अभ्यास कमी आहे. तो मोठा नेता नाही. याआधी ते राष्ट्रवादीत होते. त्यानंतर मग ते इथे आले. आता पुन्हा कुठे जातील, माहिती नाही. या योजनांसाठी सकाळी उठल्यापासून जनता टॅक्स देते. पण पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे हे आमदारांच्या हातात असते. लाडकी बहिण चांगली योजना आहे , पण अशा विधानांमुळे ही योजना बदनाम झाली आहे”, अशी टीका बच्चू कडू यांनी केले.

गुन्हे दाखल व्हायला हवे

“महायुतीच्या समन्वय बैठकीला रवी राणांना का बोलवलं नाही. मला माहिती नाही. मला बोलवलं होतं, त्यामुळे मी उपस्थित राहिलो. रवी राणासाठी मी सभा घेतली. पण त्यांची बोलायची पद्धती चुकीची आहे. ते खालच्या दर्जात बोलतात. भर सभेत लाडकी बहिण योजनेचे आमिष दाखवून विधानसभेसाठी मत मागणं हा लोकशाहीचा अपमान आहे. अशा लोकांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तुमची भावना शुद्ध हवी”, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

प्रत्येक आमदाराला वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं आम्हालाही वाटतं पण होणं आणि वाटणं यात फरक आहे, मला सेवक व्हायला आवडेल, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

रवी राणा काय म्हणाले होते?

दरम्यान रवी राणा यांनी दिवाळीनंतर राज्यातील महिलांना १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये देण्यात यावे, असे मी मागणी करेन. तुमचा भाऊ म्हणून मी सरकारला विनंती करेन की १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये बहिणांना देण्यात यावे. पण हे कधी म्हणता येईल, जेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिले नाही. मी तुमचा भाऊ आहे, ते १५०० रूपये तुमच्या खात्यातून परत घेईन, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.