झुकुंगा नहीं म्हणत बच्चू कडू यांचं शक्तीप्रदर्शन, रवी राणा यांची पहिली प्रतिक्रिया
बच्चू कडू यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातील भाषणावर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत? पाहा...

मुंबई : रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता शांतझालाय. काल रवी राणा यांनी बच्चू कडूंनी जाहीर माफी मागितली. त्यानंतर बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्या दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. रवी राणा यांच्या माफीनाम्यावरही भाष्य केलं. बच्चू कडू यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातील भाषणावर रवी राणा (Ravi Rana) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्यातला वाद मिटला आहे. हा वाद आता राहिलेला नाही, आता तो पूर्णपणे संपला आहे, असं राणा म्हणाले.
माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले. तरी जनता माझ्यासोबत आहे.जनेतेचा आशिर्वाद ज्याच्यावर असतात. तोच जिंकून येतो. मला मागच्या वेळी 20 ते 22 हजार लीड होतं, असं म्हणत आपल्याला कुणाचंही कॉम्पिटिशन नाही असंच रवी राणा यांनी ठणकावून सांगितलं.
मी लोकांना किराणा वाटून मदत करतो. अपंग आहेत त्यांना मदत करतो. माजी सैनिकांना मी मदत करतो. माझा पगार देखील माजी सैनिकांसाठी, त्यांची घरं बांधून देण्यासाठी तसंच त्यांच्या खर्चासाठी वापरतो. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी काम करतो, असं रवी राणा म्हणाले.
बच्चू कडू काय म्हणाले?
बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला. यात बोलताना त्यांनी प्रहार पक्षाचा इतिहास सांगितला. प्रहार पक्षाने कायम वंचित घटकाला न्याय देण्याचं काम केलं. दिव्यांग बांधवांसाठी काम केलं. त्यामुळे सर्वसामान्य माणूस प्रहारसोबत आहे. गर्दी नाही तर दर्दी असणं महत्वाचं आहे. आज या गर्दीतील सगळेच दर्दी आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.
जली को आग कहते है, बुझी को राख कहते है, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली सुरुवातीपासूनची लढाई सांगितली.