Uddhav Thackeray Vs Rana : मातोश्री बाहेर मध्यरात्रीपासून शिवसैनिक आक्रमक, राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी

| Updated on: Apr 23, 2022 | 7:19 AM

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापासून शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. दादर येथील शिवसेना भवनासमोर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांचा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर शिवसैनिकांकडून ते इथं आल्यानंतर त्यांना महाप्रसाद देणार असं देखील म्हटलं जामत होतं. सकाळपासून मुंबई पोलिस (Mumbai Police) राणा दाम्पत्यांची चौकशी करीत होते. पण पोलिसांचा दुपारी त्यांच्याशी संपर्क झाला. त्यावेळी ते खार येथील त्यांच्या घरी असल्याचं समजलं.

Uddhav Thackeray Vs Rana : मातोश्री बाहेर मध्यरात्रीपासून शिवसैनिक आक्रमक, राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी
राणा दाम्पत्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – राणा दांम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापासून शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. दादर येथील शिवसेना भवनासमोर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांचा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर शिवसैनिकांकडून ते इथं आल्यानंतर त्यांना महाप्रसाद देणार असं देखील म्हटलं जामत होतं. सकाळपासून मुंबई पोलिस (Mumbai Police) राणा दाम्पत्यांची चौकशी करीत होते. पण पोलिसांचा दुपारी त्यांच्याशी संपर्क झाला. त्यावेळी ते खार येथील त्यांच्या घरी असल्याचं समजलं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना एक नोटीस देखील बजावली. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रावरचं संकट दूर करण्यासाठी आम्ही मातोश्रीवरती (Matoshree) जाऊन हनुमान चाळीसाचे वाचन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच उद्या सकाळी नऊ वाचता आम्ही तिथं पोहचू असंही दाम्पत्याने जाहीर केले. त्यामुळे मातोश्रीच्या बाहेर रात्रीपासून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी शिवसैनिकांची जेवण व पाण्यासाठी विचारपूस केली आहे.

नवनीत राणा मुंबईत दाखल झाल्यापासून शिवसैनिक अधिक आक्रमक

काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना घोषणाबाजी करण्यापासून रोखण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाल्यापासून शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत. मातोश्रीमध्ये जाऊन त्यांना हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे भागातील मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यासाठी अमरावतीहून मुंबईत पोहोचले आहेत. राणा दाम्पत्याने आज मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखणे हे आज दिवसभरात पोलिसांसाठी जिकीरिचे ठरण्याचे शक्यता आहे.

नवनीत राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

नवनीत राणा यांच्या खार येथील घराबाहेर शेकडो शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी रात्रभर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद केला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात तैनात, एवढ्या विरोधानंतरही नवनीत राणा मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण कसे करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Corona Vaccine : भारतातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना Corbevax लस देणार, जाणून घ्या या लसीची वैशिष्ट्ये

Ulhasnagar Mockdrill : उल्हासनगरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रिल, भोंग्यांच्या मुद्द्यावर पोलिसांना सज्ज राहण्याच्या सूचना?